इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; लष्करी तळांना लक्ष्य केले

इस्रायलने १०० हून अधिक लढाऊ विमानांचा केला वापर

इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; लष्करी तळांना लक्ष्य केले

इस्रायलने आता हमास आणि हिजबुल्लानंतर आपला मोर्चा इराणकडे वळवला असून इस्रायलने शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी इराणवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर इस्रायली लष्कराने (आयडीएफ) एक निवेदनही जारी केले आहे. आयडीएफने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अलीकडच्या काळात इराण आणि त्यांच्या प्रॉक्सींनी आमच्यावर अनेक हल्ले केले आहेत. हा आमचा पलटवार आहे. देश वाचवण्यासाठी आम्ही काहीही करू. इस्रायलने इराणवर एकामागून एक अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.

इराण ज्या लष्करी तळांवरून इस्रायलवर हल्ले करत आहे त्या इराणी लष्करी तळांना इस्रायलने लक्ष्य केले आहे. या हल्ल्यांमागे इराणची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचा इस्रायलचा हेतू असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी, आयडीएफने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की भविष्यातही असे हल्ले होत राहतील. माहितीनुसार, इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायलने १०० हून अधिक लढाऊ विमानांचा वापर केला आहे. इराणने क्षेपणास्त्रे ठेवलेल्या इराणच्या तळांनाही इस्रायलने लक्ष्य केले आहे. शनिवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये इस्रायलने तेहरानवरही बॉम्बफेक केली.

इराणच्या लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इराण आणि स्थानिक दहशतवादी संघटना ७ ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायलवर चहुबाजूंनी हल्ला होत आहे. इराणच्या भूमीवरून तर इस्रायलवर थेट हल्ले झाले आहेत. जगातील इतर सार्वभौम देशांप्रमाणेच इस्रायललाही त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.

हे ही वाचा : 

‘बेकायदा मशिदींविरोधात हिंदूंनी आवाज उठवला तर गृहयुद्ध होईल’

आदित्य ठाकरेंची गडगंज संपत्ती, भातखळकर म्हणाले, वाझे प्रसन्न…

जय गाझा- जय पॅलेस्टाईनवाल्या आव्हाडांवर वेदमंत्रांचा शिडकावा कशासाठी?

रतन टाटांनी घेतला निरोप, मात्र, निघताना नोकर आणि श्वानाचीही केली सोय!

काही दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावरही ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात इस्रायलच्या पंतप्रधानांना कोणतीही इजा झालेली नाही. नंतर हिजबुल्लाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी एक वक्तव्य जारी केले होते की, ज्यांनी हा हल्ला केला आहे, आम्ही त्याला तसाच जाऊ देणार नाही आणि ज्यांनी अशा लोकांना पाठिंबा दिला त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. हिजबुल्लाह, हुथी आणि हमास या दहशतवादी संघटनांना इराणचा पाठिंबा आहे. इस्रायलच्या विरोधात इराण या दहशतवादी संघटनांना सतत पाठिंबा देत आहे.

Exit mobile version