इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध शमण्याची चिन्हे दिसत नसून संघर्ष अधिक तीव्र होत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात निष्पाप पॅलेस्टिनी आणि इस्रायली लोकांचे बळी गेले आहेत. या युद्धामुळे गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत हजारो पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे.
अशातच इस्रायलने उत्तर गाझामधील एका शाळेवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात जवळपास २० जणांचा मृत्यू झाला असून १२ लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, हमास दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी इस्रायलने हल्ले अधिक तीव्र केले असून गाझा पट्टीतील नागरिकांना दक्षिणेकडे स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. सातत्याने इस्रायलकडून हल्ले सुरू आहेत. या युद्धात इस्रायलमध्ये १ हजार ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हमासने २०० हून अधिक लोकांचं अपहरण करून त्यांना ओलिस ठेवलं आहे. इस्रायली लष्कराच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमुळे गाझा पट्टीमध्ये मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या ९ हजार २०० हून अधिक झाली आहे.
हे ही वाचा:
उर्फी जावेद आली अडचणीत, बनावट पोलिसांना घेऊन व्हीडिओ बनविल्याचा आरोप
बनावट पोलीस अधिकाऱ्याने ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून केली हत्या!
जरांगेंनी उपोषण सोडल्यावर राज्य सरकारची ठोस पावले
बनावट कागदपत्रांच्या आधारे ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला नावावर केला
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गाझा शहरातील रुग्णवाहिकेच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात किमान १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलनेही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. पण, रुग्णवाहिकेत हमासचे सैनिक होते, असे त्यात म्हटले आहे. या ताफ्यात पाच रुग्णवाहिकांचा समावेश होता, ज्या रफाह क्रॉसिंगकडे जात होत्या. असाच एक हल्ला किनारी भागात झाला, जिथे दक्षिणेकडे जाणाऱ्या लोकांवर हवाई हल्ला करण्यात आला, यामध्ये सुमारे १४ जणांना प्राण गमवावे लागले.