फ्रान्सच्या उत्तर भागातील अर्रासमधील गॅम्बेटा-कारनोट पब्लिक स्कूलमध्ये घुसलेल्या एका इस्लामिक कट्टरपंथीने केलेल्या हल्ल्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेनंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ‘इस्लामिक दहशतवादाचा फ्रान्सवर विपरित परिणाम होत आहे,’ असे मत व्यक्त केले आहे.
फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी या घटनेनंतर शाळेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सुमारे तीन वर्षांपूर्वी सॅम्युअल पॅटीच्या हत्येनंतर पुन्हा एकदा शाळेमध्ये दहशतवादाची घटना घडली. मॅक्रॉन यांनी या प्रसंगाला सामोरे गेलेले शिक्षक आणि दोन्ही जखमी विद्यार्थ्यांसह एक शिक्षक आणि शाळेच्या कर्मचाऱ्याचे कौतुक केले. ‘आपण एकत्र उभे आहोत, समर्थपणे उभे आहोत,’ असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
ऑपरेशन अजय: २३५ प्रवाशांना घेऊन दुसरे विमान भारतात दाखल
एक लाख इस्रायली सैनिकांचा गाझाला वेढा
क्रिकेटच्या २०२८ लॉस एंजलेस ऑलिम्पिक गेम्समध्ये समावेशासाठी हिरवा झेंडा
डोंबिवलीतील शाळेच्या शिक्षिकेकडून ५० ते ६० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण!
हा हल्लेखोर शस्त्र घेऊन शाळेत पोहोचला होता. तो धार्मिक नारेबाजी देत होता. या दरम्यान दोन शिक्षक, कर्मचारी आणि दोन विद्यार्थ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला तर, दोन विद्यार्थी जखमी झाले. हल्ला केल्यानंतरही आरोपी धार्मिक नारेबाजी करत होता. थोड्याच वेळात पोलिसांनी संपूर्ण शाळेला चारही बाजूंनी घेराव घातला आणि आरोपीला अटक केली. हल्लेखोर कट्टरपंथी इस्लामशी संबंधित असून या शाळेचा माजी विद्यार्थी आहे.