बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर इस्लामिक कट्टरतावादींचा हल्ला!

बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर इस्लामिक कट्टरतावादींचा हल्ला!

बांगलादेशमधील दुर्गापूजेच्या मंडपाचे नुकसान केल्यानंतर शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) धर्मांधांनी इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. धर्मांधांनी मंदिराची तोडफोड करून मंदिराला आग लावली. या प्रकरणानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या दरम्यान अनेक ठिकाणी धर्मांधांनी मंदिरे आणि दुर्गा पूजा मंडपांची तोडफोड केली आणि मूर्तींचेही नुकसान केले. यामध्ये चार लोकांचा मृत्यूही झाला आहे.

पंतप्रधान शेख हसीना, दुर्गा पूजेच्या निमित्ताने ढाकाच्या ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिरात प्रत्यक्षात उपस्थित राहिल्या होत्या. तेव्हा त्यांनी हिंदू समुदायाला सांगितले की, ‘तुम्हाला या देशाचे नागरिक मानले जाते. तुम्हाला समान हक्क असतील. तुम्हाला समान अधिकार असतील. तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करू शकाल आणि समान अधिकारांनी सणही साजरे करू शकाल. हेच आपल्या बांगलादेशचे खरे धोरण आणि आदर्श आहे.’

मी तुम्हाला पुन्हा विनंती करते की, ‘तुम्ही स्वतःला कधीही अल्पसंख्याक समजू नका.’ हसीना म्हणाल्या की, ‘या घटना अशा वेळी घडल्या जेव्हा देश विकासाच्या दिशेने गतीने पुढे जात आहे. या घटनांचा उद्देश देशाच्या प्रगतीत अडथळा आणणे आणि समस्या निर्माण करणे हाच होता. हिंदूंच्या सर्वात मोठ्या सणानिमित्त हिंदू देवतेच्या पायावर कुराणची बनावट चित्रे पसरवून अशांतता भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

क, ड संवर्ग पदभरती प्रक्रियेला गोंधळाचा संसर्ग

मुख्यमंत्र्यांनी केवळ गरळ ओकली

बालकल्याण मंत्री म्हणतात, महिलांनो झोपायच्या आधी थोडी दारू प्या!

जनाब राऊत…तुम्हाला वाघाच्या शेपटीचीही उपमा देता येणार नाही

इस्कॉनने ट्विट केलेल्या फोटोंच्या माध्यमातून हिंसक जमावाने मंदिराचे कसे नुकसान केले हे स्पष्टपणे समजू शकते. इस्कॉनने सांगितले की, ‘जमावाने भाविकांवर हिंसक हल्ला केला. मंदिराचे खूप नुकसान झाले आहे आणि अनेक भाविकांची परिस्थिती गंभीर आहे. आम्ही बांगलादेश सरकारकडे हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्याची आणि दोषींना न्याय देण्याची मागणी करतो.’

बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या आश्वासनाच्या नंतरही हबीगंज जिल्ह्यातील दुर्गा पूजा स्थळावर मदरसा विद्यार्थी आणि हिंदू समुदाय यांच्यात संघर्ष झाला. गुरुवारी झालेल्या चकमकीत एका पोलिसासह २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, ही घटना हबीगंज जिल्ह्यातील नबीगंज उपजिल्ह्यातील एका गावात घडली.

इस्लामचा अपमान केल्याच्या निषेधार्थ मदरशातील विद्यार्थ्यांनी ही मिरवणूक काढली तेव्हा ही घटना घडली. जेव्हा मिरवणूक मंदिरात पोहचली तेव्हा आंदोलक आणि हिंदू भक्त यांच्यात वाद झाला आणि या दरम्यान चकमक झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

बांगलादेशमधील कमिला शहरातील एका मंदिरात आणि अनेक ठिकाणी दुर्गा पूजा मंडपांची बुधवारी अतिरेक्यांनी तोडफोड केली आणि या चकमकीत चार जण ठार झाले. तक्रार करूनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत, असा आरोप हिंदू समुदायाने केला आहे. या घटना लक्षात घेऊन आता बांगलादेशच्या २२ जिल्ह्यांमध्ये सैन्य तैनात करण्यात आले.

Exit mobile version