28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरदेश दुनियाभारतात हातपाय पसरण्याचा दहशतवादी संघटना आयसीसचा प्रयत्न

भारतात हातपाय पसरण्याचा दहशतवादी संघटना आयसीसचा प्रयत्न

ऑनलाइनच्या माध्यमातून भारतीय तरुणांशी संपर्क साधला जात आहे.

Google News Follow

Related

आयएसआयएस ही दहशतवादी संघटना स्थानिक दहशतवादी मॉड्युल स्थापित करून संपूर्ण भारतात हातपाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए त्यांचे हे मनसुबे हाणून पाडण्यासाठी कसून तपास करते आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या अहवालानुसार, पुन्हा एकदा आयएसकेपी (आयएस खुरासान) मॉड्युल भारतामध्ये राबवण्याचा कट रचला जात आहे.

 

अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर कट्टरवाद्यांचा नवा गट स्थापन करण्यात आला आहे. तसेच, ऑनलाइनच्या माध्यमातून भारतीय तरुणांशी संपर्क साधला जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे ब्रेन वॉश करून तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढले जात आहे. तरुण डॉक्टर आणि इंजिनीअर त्यांच्या निशाण्यावर आहेत.

 

एनआयएने केलेल्या तपासात, महाराष्ट्रातील पुणे आणि केरळमध्ये हे मॉड्युल राबवले जात आहे, असे समोर आले आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरून इंक्रिप्टेड मॅसेजिंग ऍप्लिकेशनच्या मदतीने संवाद साधला जात आहे. आयएसकेपीला बळ देण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयही मदत करत असल्याचे एनआयएला चौकशीत आढळून आले आहे. गेल्या काही महिन्यांत आयएसआयएसच्या विचारांनी प्रभावित झालेल्या काही लोकांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीत ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.

 

 

या कटाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-पाकिस्तानची सीमा आहे. त्यातूनच आयएसआयएसच्या या नव्या प्रारूपाला चालना मिळते आहे. या मॉड्युलने भारतात केरळ, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील तरुणांना लक्ष्य केले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन झाल्यापासून या मॉड्युलला अधिक चालना मिळाली आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून कट्टरवादाला खतपाणी घातले जात आहे.

 

हे ही वाचा:

सीबीआय चौकशी सुरू असलेल्या सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या

लँडिंग पॉईंटच्या ‘शिवशक्ती’ नावावरून काँग्रेसला पोटशूळ

काळू- बाळूंची कन्स्पिरसी थिअरी

एकट्या पोलिसाने कोयता घेऊन हप्ते वसुली करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

एनआयए ‘ऑपरेशन चक्रव्यूह’च्या माध्यमातून त्यांचे कट उधळून लावण्याचा प्रयत्न करते आहे. गेल्या सहा महिन्यांत आयएसआयएसच्या विचारांनी प्रभावित दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे फैजान अन्सारी (अलीगढ) आणि डॉ. अदनानानाली (पुणे) आहेत. तसेच, महाराष्ट्रातून आयएसआयएसच्या विचारांनी प्रभावित सहाजणांना अटक करण्यात आली आहे. भारतीय सीमेपलीकडूनही घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. आयएसआयच्या मदतीने काश्मीरपासून देशातील विविध राज्यांत विविध स्तरांवर कट रचला जात आहे. त्यामुळे एनआयएनेही आपली तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा