अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार आल्यानंतर हिंसाचार थांबलेला नाही. आता अफगाणिस्तानच्या पू्र्वेला असलेल्या नंगरहार प्रांतात तालिबान्यांच्या वाहनांना निशाणा बनवण्यात आलं आहे. जलालाबादमध्ये ही घटना घडली आहे. इथं एका पाठोपाठ एक ३ स्फोट घडवण्यात आले. ज्यामध्ये ३ लोकांचा मृत्यू झाला आहे तर २० लोक जखमी झाले आहेत. जलालाबादच्या या स्फोटांची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारलेली नाही. मात्र पूर्वी अफगाणिस्तानचा हा भाग इस्लामिक स्टेटला बालेकिल्ला मानला जातो, त्यातच इस्लामिक स्टेट तालिबानला शत्रू मानतो, त्यामुळे त्यांनीच हा हल्ला घडवून आणला असू शकतो.
अजून हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही की, या हल्ल्यात तालिबानी अधिकारी मारले गेले की सामान्य लोक. तिकडे काबुलमध्येही एका बॉम्ब हल्ल्यात २ जण जखमी झाले. अद्याप हे कळू शकलेलं नाही की, कुणाला टार्गेट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. आयईडी प्रकारच्या विस्फोटकांचा या हल्ल्यात वापर करण्यात आला होता. या हल्ल्यात एक कार पूर्णपणे बेचिराख झाली तर बाजूच्या दुकानांचंही नुकसान झालं.
हे ही वाचा:
रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा
गडहिंग्लजसाखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला
आज होणार हसन मुश्रिफांचा आणखीन एक घोटाळा उघड
जॅवलिन एक प्रेमकथा…नीरज चोप्राच्या जाहिरातीचा धमाका
तिकडे काबूलमध्ये पूर्वीच्याच तालिबानचं राज्य जाणवायला सुरुवात झाली आहे. कारण, नवीन तालिबान म्हणून सत्तेत आलेल्या तालिबानच्या राज्यात महिलांचे सगळे अधिकार तर गेलेच आहेत. शिवाय, शिक्षा देण्याचं नवं सत्रही सुरु झालं आहे. काबुलमध्ये दिवसा ढवळ्या २ लोकांना मारुन चौकात फेकण्यात आलं. बीबीसीने ही माहिती दिली आहे. त्यांनी लहान मुलांचं अपहरण केलं असा आरोप करण्यात आला होता. आणि या आरोपानंतर त्यांना चौकात मारुन फेकण्यात आलं. या २ व्यक्तींनी कुणी मारलं हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, मारणाऱ्यांने एक नोट लिहून हे २ मृतदेह चौकात फेकून दिले होते.