33 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरदेश दुनियाअफगाणिस्तानमध्ये आयसिसचे सुसाईड बॉम्बर्स

अफगाणिस्तानमध्ये आयसिसचे सुसाईड बॉम्बर्स

Google News Follow

Related

अफगाणिस्तानमध्ये केवळ तालिबानच नाही, तर जगभरात आपल्या हिंस्र कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयसीसचाही धोका आहे. हा धोका केवळ सर्वसामान्यांसाठी नसून अगदी जगातील बलाढ्य देशांच्या सैन्याला म्हणजेच नाटोच्या सैन्यालाही आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या एका वक्तव्यानंतर हे उघड झालंय. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये आयसिसचे सुसाईड बॉम्बर्स फिरत असताना अमेरिका ब्रिटनच्या सैन्याला आयसिसच्या भरवशावर सोडून जाऊ शकत नाही, असंही जॉन्सन यांनी बायडन यांना सुनावलंय.

बोरिस जॉन्सन म्हणाले, “काबुलवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर ८ दिवसानंतर येथे आयएसआयएसचे सुसाईड बॉम्बर्स फिरत आहेत. त्यामुळे अमेरिका ब्रिटिश सैनिकांना आयसिसच्या आत्मघातकी हल्लेखोरांच्या दयेवर सोडून जाऊ शकत नाही.” जगाचं लक्ष अफगाणिस्तानवर आहे. या कठिण काळात नोटोचं सैन्यच अफगाणिस्तानला वाचवू शकतं असं अनेक जण म्हणत आहे. मात्र, आता नाटोचं सैन्यही अडचणीत सापडल्याचं दिसत आहे. मित्र देशांचं सैन्य अफगाण सोडत असताना त्यांच्या शक्तीवरही प्रश्नचिन्हा उपस्थित केले जाऊ लागलेत. नाटो सैन्याच्या प्रतिष्ठेवरही गालबोट लागलंय. तालिबानने नोटो सैन्यालाही गुडघ्यावर आणलंय का असाही प्रश्न उपस्थित होतोय.

अमेरिकेने आपलं सैन्य माघारी घेण्याची घोषणा केल्यानंतर तालिबानला चांगलंच स्फुरण आलेलं दिसतंय. अमेरिकेने आपलं संपूर्ण सैन्य अफगाणिस्तानमधून काढून घेण्याची घोषणा केलीय. यासाठी त्यांनी डेडलाईनही तयार केलीय. यामुळे अफगाणमध्ये लढणाऱ्या नाटो सैन्यावर विपरित परिणाम झालाय. त्यामुळेच नाटोतील देशांमध्येही अमेरिकेच्या या निर्णयावरुन मतभेद असल्याचं समोर आलंय.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांच्या सहाय्यकांवर ईडीचे आरोपपत्र

टॅबचे पैसेच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा!

खासगीकरणाच्या मार्गावर धावू लागली लालपरी

पंजाबमधील शाळा ओळखल्या जाणार हॉकीपटूंच्या नावाने!

ब्रिटनने आतापर्यंत ६००० सैनिक आणि सामान्य लोकांना सुरक्षित बाहेर काढलंय. या आठवड्यात आणखी ६००० लोकांना वाचवण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी ब्रिटनला कंधारमध्ये एक सिक्रेट ऑपरेशन करावं लागलं आणि येथेच अफगाणिस्तानमधील स्फोटक स्थिती समोर आली. कंधार विमानतळावर तालिबानने कब्जा केलाय. त्यामुळे तेथे अडकलेल्या नाटो सैन्याला वाचवणंही अवघड झालंय. त्यात अमेरिकेने सैन्या माघारी घेण्याचा निर्णय घेतल्यानं नाटो सैन्याचा जीव धोक्यात आलाय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा