22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनियाइराकमध्ये आयएसआयएस डोकं वर काढतंय?

इराकमध्ये आयएसआयएस डोकं वर काढतंय?

Google News Follow

Related

इराकची राजधानी बगदादच्या उपनगरामध्ये इस्लामिक दहशतवादी संघटना आयएसआयएस म्हणजेच इस्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया या गटाने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ३६ हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. ईद-उल-अधाच्या आधी लोक बाजारात खरेदी करत असताना सोमवारी सायंकाळी हा हल्ला झाला. या अपघातामुळे संपूर्ण बगदाद मध्ये शोककळा पसरली आहे. इराकमध्ये पुन्हा आयएसआयएस डोकं वर काढेल का? अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

युद्धग्रस्त देशात सोमवारी संध्याकाळी झालेल्या रक्तरंजित हत्याकांड हे वर्षातील सर्वात मृतांपैकी एक आहे. या हल्ल्यात किमान ३६ जणांचा बळी गेला आहे तर डझनभर जखमी आहेत. ईद-अल-जुहा चा मुस्लिम उत्सव सुरू होण्याच्या काही तास आधी ही घटना घडली.

या हल्ल्यामुळे दहशतवादी संघटना आयएसआयएस ही दहशतवादी संघटना पुन्हा तोंड काढणार का? अशी भीती पुन्हा नव्याने निर्माण झाली आहे. २०१७ सालापर्यंत ही संघटना इराक आणि सीरियामध्ये सक्रिय होती. परंतु दुर्गम वाळवंट आणि पर्वतीय भागांमध्ये केलेल्या भीषण मोहिमेनंतर इराकमधील शेवटचे क्षेत्र गमावले.

ईदच्या खरेदीसाठी सजवलेल्या आणि गर्दीने भरलेल्या ईशान्य बगदादमधील सदर शहराच्या शिया जिल्ह्यातील वोहेलट मार्केटमध्ये आयएसच्या आत्मघाती हल्लेखोरांनी स्फोट केल्याचा दावा सुन्नी मुस्लिम जिहादींनी केला आहे.

या हल्ल्यानंतर लोक घाबरले आणि अफरातफरीमुळे गोंधळ झाला होता. सर्वत्र ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज आला आणि धुरामुळे संपूर्ण मार्केट अंधारात बुडून गेले होते. जेव्हा धूर निघून गेला, तेव्हा जळलेले मानवी अवशेष, बाजारातील दुकानाचे साहित्य विखुरलेले होते.

हे ही वाचा:

काय होता राज कुंद्राचा पॉर्न ‘प्लॅन बी’?

६७% भारतीयांमध्ये कोरोना अँटीबॉडीज

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोगागी तुंबाई

ठाणे महानगरपालिकेची १५ लेडीज बारवर धाड

राष्ट्राध्यक्ष बारहम सलिह यांनी “ईदच्या आदल्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व क्रौर्याच्या जघन्य गुन्ह्याचा निषेध केला आहे” आणि ट्विटरवर लिहिले आहे की दोषींना चैनीने जगू देणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा