इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या जागतिक दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू हसन अल-हाशिमी अल-कुरेशी याचा बुधवारी मृत्यू झाला आहे. युद्धादरम्यान कुरेशीचा मृत्यू झाला असल्याची माहिती इसिस संघटनेने जाहीर केली आहे. यासोबतच इसिसने आपल्या नवीन म्होरक्याची घोषणासुद्धा केली आहे.
इसिसच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आमचा नेता कुरेशी क्षत्रूंशी लढताना युद्धात मारला गेला आहे. या दहशतवादी संघटनेच्या प्रवक्त्याने एक ऑडिओ संदेश जारी करत ही माहिती दिली असून, इसिसच्या नवीन नेत्याच्या नावाची घोषणाही केली आहे. दरम्यान, कुरेशीच्या मृत्यूची तारीख किंवा दिवस याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
अबू हसन अल-हाशिमी अल-कुरेशी हा इसिसचा तिसरा प्रमुख होता. या वर्षी फेब्रुवारीमध्ये दहशतवादी संघटनेचा दुसरा प्रमुख अबू इब्राहिम अल-कुरेशीला अमेरिकेने हवाई हल्ल्यात उत्तर सीरियातील इदलिब प्रांतात ठार केलं होते. त्याआधीचा इसिस नेता अबू बक्र अल-बगदादी हाही ऑक्टोबर २०१९ मध्ये इदलिबमध्येच मारला गेला होता. अबू हसन अल-हाशिमी अल-कुरेशी हा इसिसचा पहिला म्होरक्या अबू बकर अल-बगदादीचा भाऊ असल्याचे सांगण्यात येते.
हे ही वाचा :
अफगाणिस्तानात स्फोटांची मालिका सुरूच; मदरशातील स्फोटाने घेतले १८ बळी
दिलासा नाहीच; नवाब मलिक यांचा तुरुंगातच मुक्काम
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला येणार नागपुरात
साडेतीन मिनिटानंतर ती ‘पास्ता’वली आणि तिने केली कंपनीची तक्रार
२००८ मध्ये अमेरिकन लष्कराने अबू हसन अल-हाशिमी अल-कुरेशीला मोसुलमधून अटक केली होती. त्यानंतर त्याला बराच काळ डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान तो सांगत होता की तो इसिसमध्ये सामील झाला नव्हता, तर न्यायाधीश म्हणून नियुक्त झाला होता. अटकेनंतर काही वर्षांनी त्यांची सुटका झाली. सुटकेनंतर त्याने इसिसमध्ये मोठी भूमिका बजावण्यास सुरुवात केली. त्याच्या मृत्यूची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. तसेच याच्या मृत्यूनंतर अबू अल-हुसेन अल-हुसेनी अल-कुरेशीला इसिसचा नवा प्रमुख म्हणून घोषित केले आहे.