अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या दोन स्फोटांमुळे किमान ७२ लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तालिबानने या स्फोटांचा निषेध केला असून या स्फोटांची जबाबदारी (आयएसआयएस-खुरासान) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. या दहशतवाद्यांना आम्ही माफी करणार नसून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल अशा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे.
The terror group ISIS-K claimed responsibility for the deadly double attack at Kabul airport on the group's Telegram account: SITE monitoring
— ANI (@ANI) August 26, 2021
(आयएसआयएस-खुरासान) या दहशतवादी गटाने आपल्या टेलिग्राम अकाऊंटवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचं जाहीर केलं. गुरुवारी रात्री काबुल विमानतळावर झालेल्या दोन स्फोटांमध्ये किमान ६० अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला असून १५० हून जास्त नागरिक जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या व्यतिरिक्त ११ अमेरिकन सैनिकांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. मृतांच्या आकड्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
जुनी वाहने भंगारात काढणे का गरजेचे आहे?
सरसंघचालकांनी घेतले भगवान जगन्नाथाचे दर्शन, गोवर्धन पिठाच्या शंकराचार्यांशीही भेट
हा बॉम्ब हल्ला सुसाईड बॉम्बिंग प्रकारातील असल्याचे समजते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काबूल विमानतळावर एकच गोंधळ उडालेला दिसला. अमेरिकेच्या पेंटागॉन कडून या बॉम्ब हल्ल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पेंटागॉनच्या दाव्यानुसार या हल्ल्यांमध्ये अमेरिकन नागरिकां सोबतच अफगाणिस्तानचे नागरिकही मारले गेले आहेत. यापैकी एक बॉम्बस्फोट हा काबुल विमानतळाच्या प्रवेशद्वाराशी झाला असून दुसरा हल्ला विमानतळा नजीक असणाऱ्या बॅरोन हॉटेल जवळ झाला आहे. काबुल मधील अमेरिकन दूतावासाचे म्हणणे आहे की काबुल येथे विमानतळावर गोळीबारही करण्यात आला. जेणेकरून अमेरिकन नागरिक यावेळेला प्रवास करून काबुल मधून बाहेर पडू नयेत.