23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामादिल्ली, नोएडामधील शाळांना आलेल्या धमकीच्या ईमेलपाठी आयएसआयचा हात?

दिल्ली, नोएडामधील शाळांना आलेल्या धमकीच्या ईमेलपाठी आयएसआयचा हात?

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

Google News Follow

Related

दिल्ली आणि नोएडामधील अनेक शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रशियाचे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) दिल्ली-एनसीआरमधील शाळांना बॉम्बची धमकी देणारे ई-मेल पाठवण्यासाठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंटरनेट हे रशियन आहे, पण ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून वापरले जाऊ शकते. म्हणून, ज्या उपकरणावरून ते पाठवले गेले आहे त्याचा आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) पत्ता, म्हणजेचं फोन, लॅपटॉप किंवा संगणक याचा शोध घेतला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे सोपवण्यात आला आहे. आयटी कायद्याशिवाय, पोलिस या प्रकरणात आयपीसीची इतर कलमे देखील लावू शकतात.

स्पेशल सेलच्या इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिटने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ‘savariim@mail.ru’ या आयडीवरून धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. सवारैम हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ होतो तलवारीचा संघर्ष. इस्लामिक स्टेटने (IS) २०१४ मध्ये त्याचा वापर सुरू केला होता. सध्या तपास प्राथमिक टप्प्यात आहे, त्यामुळे हा ई-मेल आयएसकडून आला आहे, असे ठामपणे सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. धमकीचा ई-मेल पाठवण्यासाठी प्रॉक्सी पत्ता वापरण्यात आला आहे.

शाळांना धमकीचे ईमेल पाठवणे हा संपूर्ण कट अतिशय विचारपूर्वक रचण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआरच्या शाळांना मेल पाठवण्याची प्रक्रिया बुधवारी पहाटे ४ वाजल्यापासून सुरू झाली, जी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती. ज्या उपकरणावर रशियन व्हीपीएन वापरला होता त्याचा आयपी पत्ता (फोन, लॅपटॉप किंवा संगणक) आरोपींनी नष्ट केला असावा अशी भीती आहे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच जिओ स्पूफिंगद्वारे कोणत्याही देशात बसून कोणत्याही देशाचा व्हीपीएन निवडला जाऊ शकतो. याद्वारे तुम्ही आयपी ॲड्रेसही बदलू शकता. म्हणजे तुमचे लोकेशन बदलले जाऊ शकते. अशा स्थितीत मेल पाठवणाऱ्या आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांना आव्हानात्मक असणार आहे.

हे ही वाचा:

अमित शाह एडिटेड व्हिडीओ प्रकरणी ‘एक्स’कडून झारखंड काँग्रेसचे अकाऊंट बंद

‘देशातील संकटकाळी इटलीला पळून जाणाऱ्यांनी तिकडूनच निवडणूक लढवावी’

सिद्धू मूसवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या?

हैदराबादमध्ये अपराजित ओवैसी यांना कडवे आव्हान माधवी लता यांचे

ईमेल आयडीच्या आयपी ॲड्रेसच्या प्राथमिक तपासणीत व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आणि प्रॉक्सी सर्व्हरच्या मदतीने लपवण्यात आल्याचे समोर आले आहे. सायबर तज्ञांना दोन आयपी पत्ते शोधण्यात यश आले पण पुढे काहीही हाती लागले नाही. ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी केवळ तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही, तर ईमेलच्या पॅटर्नचाही विचार केला जात आहे. इस्लामिक धार्मिक श्लोक ईमेलमध्ये लिहिलेले आहेत. याव्यतिरिक्त, प्रेषकाचे नाव ‘सवारीम’ देखील आयएसआयने रचलेल्या इस्लामिक गाण्यावरून (नशीद) घेतलेले दिसते. हे गाणे रक्तपात आणि युद्धाबद्दल बोलते, जे या ईमेलसारखेच आहे. इतक्या शाळांना ईमेल आल्यामुळे पोलिसांना हा पूर्वनियोजित कट वाटत आहे. त्यासाठी शाळांचे ईमेल पत्ते गोळा करावे लागले. ही यादी एकतर डार्क वेबवरून घेतली गेली असावी किंवा इंटरनेटवर सार्वजनिकपणे उपलब्ध असलेल्या माहितीवरून प्रोग्रामच्या मदतीने शोधली गेली असावी.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा