आयसिसच्या म्होरक्याचा खात्मा

आयसिसच्या म्होरक्याचा खात्मा

इस्लामिक स्टेट अर्थात आयसिसचा म्होरक्या अबू इब्राहिम अल हशिमी अल कुरेशी याचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्यात अबू इब्राहिम मारला गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. अमेरीकेच्या विशेष सैन्यपथकाने गुरुवार ३ फेब्रुवारी रोजी रात्री केलेल्या एका गुप्त मोहिमेत अबू इब्राहिम अल हशिमी अल कुरेशीचा खात्मा केला आहे. पण त्याच्या मृत्यूला अमेरिकन सैन्य कारणीभूत असले तरीही तो अमेरिकन सैनिकांच्या गोळ्यांनी मेला नाही. अमेरिकन सैन्य येत असल्याचे कळताच त्याने बॉम्बस्फोटात स्वतःला उडवून दिले.

अमेरिकन सैन्याने सीरियामध्ये ही विशेष मोहीम आखली होती. या मोहिमेच्या अंतर्गत सीरियातील इदलिब प्रांतात अमेरिकन सैन्याने घुसून ही मोहीम यशस्वी केली. सीरियातील इदलिब प्रांतात अबू इब्राहिम अल हशिमी अल कुरेशीचा ठिकाणा होता. कुरेशी हा बगदादीच्या मृत्यूनंतर आयसिसचा प्रमुख झाला होता. पण अमेरिकेने बगदादी सारखाच त्याचाही खात्मा केला आहे.

हे ही वाचा:

‘सीमा वादात अमेरिकेने भारताच्या बाजूने म्हणजे मोदी सरकारच्या कूटनीतीचे यश’

बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

माघी गणेशोत्सव का साजरा केला जातो?

दक्षिण आशियातील सर्वाधिक रामसार क्षेत्र भारतात

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी याब संदर्भात बोलताना एक भयावह दहशतवादी मारला गेल्याचे म्हटले आहे. तर अल कुरेशीही त्याच प्रकारे मारला गेला जसा अल बगदादी मारला गेला तसेच अल कुरेशीही मारला गेल्याचे बायडन यांनी म्हटले आहे.

Exit mobile version