इफ्तार पार्ट्यांना गैर मुस्लिमांच्या उपस्थितीचा अर्थ काय?

इफ्तार पार्ट्यांना गैर मुस्लिमांच्या उपस्थितीचा अर्थ काय?

सध्या रमजानचा पवित्र महिना चालू आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजे (कडक निर्जळी उपवास) पाळणे, आणि
सूर्यास्तानंतर उपवास सोडणे, असे व्रत संपूर्ण महिनाभर धार्मिक मुस्लिमांकडून पाळले जाते. सायंकाळी सूर्यास्तानंतर
उपवास सोडताना जे भोजन घेतले जाते, त्याला “इफ्तार” असे म्हटले जाते.
हा विषय, – रोजे, इफ्तार वगैरे – संपूर्णतः ‘इस्लाम’च्या क्षेत्रात येतो. त्यामुळे जिज्ञासा म्हणून, “ह्या विषयी ‘इस्लाम’
काय सांगतो ?” याची अधिकृत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जी माहिती मिळाली, ती प्रचलित
समजुतींच्या, किंवा ज्याला ‘सामान्य ज्ञान’ म्हटले जाते, त्याच्या अगदी विपरीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा
विषय इथे मांडणे आवश्यक वाटले.

सामान्य गैरसमजुती :

सामान्यतः असे मानले जाते, की इफ्तारच्या भोजन समारंभाला एखाद्या मुस्लिमाच्या मित्र परिवारातील कोणीही
व्यक्ती (गैर मुस्लीम व्यक्तीसुद्धा) आमंत्रित केल्या जाऊ शकतात, उपस्थित राहू शकतात. किंबहुना, मुस्लीम आणि गैर
मुस्लीम यांच्यातील मैत्रीसंबंध निकोप, दृढ राहावेत, टिकावेत, यासाठी रमजानच्या महिन्यातील या इफ्तार
मेजवान्यांचा उपयोग केला जातो, आणि तसा तो जरूर करावा. अगदी ह्याच समजुतीनुसार, बरेचसे निधर्मी,
पुरोगामी, आधुनिक विचारांचे सामाजिक / राजकीय नेते, विचारवंत, हे या ‘इफ्तार’ पार्ट्यांना आवर्जून उपस्थित
राहतात, कधीकधी स्वतः सुद्धा तशा पार्ट्या आयोजित करतात.

दुर्दैवाने खरी परिस्थिती अगदी वेगळी आहे. इफ्तार पार्ट्यांना गैर मुस्लिमांना आमंत्रित करावे की नाही ? व केल्यास
त्या आमंत्रणाचा ‘योग्य’ – म्हणजे इस्लामला मान्य – हेतू नेमका काय असावा ? ह्याविषयी इस्लाममध्ये स्पष्ट सूचना
आहेत. त्यांचा कुराण, हदीस आदि धर्मग्रंथांत जागोजागी विस्तृत उल्लेख आढळतो. एखादा सच्चा मुस्लीम जेव्हा
एखाद्या गैर मुस्लिमाला इफ्तार पार्टीला बोलावतो, तेव्हा त्याचा खरा हेतू काय असतो किंवा असावा, यासंबंधात ह्या
सूचना महत्वाच्या आहेत.

काय आहेत ह्या सूचना ?

इस्लाममध्ये योग्य, वाजवी, इस्लामला मंजूर गोष्टींना “हलाल”, आणि याच्या उलट / विरोधी गोष्टींना “हराम” म्हटले
जाते, हे सर्वविदित आहे. तर प्रश्न असा, की “मुस्लिमाने गैर मुस्लीम व्यक्तीला इफ्तार पार्टीसाठी बोलावणे ‘हराम’
आहे का ?” आपण याचे इस्लामनुसार अधिकृत उत्तर बघू.
——————————
या पुढील भाग पूर्णपणे “इस्लाम प्रश्न आणि उत्तर“ – या नावाच्या इस्लामच्या विश्वसनीय वेबसाईट वरून घेऊन
उद्घृत केलेला आहे. इस्लामचा प्रसार करणे, इस्लाम संबंधी प्रश्न, शंकांना शैक्षणिक, विद्वन्मान्य अधिकृत (इस्लामिक)
उत्तरे देऊन, गैर इस्लामी लोकांना इस्लामकडे आकृष्ट करणे, त्यांना इस्लाम संबंधी मार्गदर्शन करणे, हा या
वेबसाईटचा हेतू असून, इथे दिली जाणारी उत्तरे इस्लामच्या अधिकृत धर्मग्रंथातील मजकुरावर आधारित असतात.
ह्या उत्तरांचे संपादन “शेख मुहम्मद सालीह अल-मुनाज्जीद” यांच्याकडून केले जाते.
—————————–
“मुस्लिमाने गैर मुस्लीम व्यक्तीला इफ्तार पार्टीसाठी बोलावणे योग्य आहे का?” ह्या प्रश्नाचे उत्तर :
गैर मुस्लीम व्यक्तींना इफ्तार पार्टीला बोलावणे तेव्हाच उचित ठरेल, जेव्हा त्यामागचा हेतू, ‘त्यांना खऱ्या
धर्माकडे (इस्लामकडे) आकृष्ट करणे किंवा निदान त्यांच्या मनात इस्लामविषयी जिज्ञासा उत्पन्न
करणे, एक हळुवार कोपरा (Soft corner) निर्माण करणे’, हाच असेल. जेव्हा गैर मुस्लीम व्यक्ती
मुस्लिमांच्या सांप्रदायिक इफ्तार पार्टीला येऊन, मुस्लिमांसह इफ्तारच्या मेजवानीचा आनंद घेत
असेल, तेव्हा तिच्याबाबत सच्च्या मुस्लिमाची अपेक्षा अगदी हीच असते. पण याउलट जर अशा
आमंत्रणांचा उद्देश केवळ त्यांच्याशी (गैर मुस्लिमांशी) मित्रत्वाचे संबंध राखणे आणि त्यांच्या
सहवासाचा आनंद घेणे, हाच असेल, तर ती अत्यंत ‘धोकादायक बाब’ आहे. याचे कारण म्हणजे,

“अल-वाला” आणि “वाल-बारा” (अर्थात, इस्लामवर श्रद्धा असलेल्यांशीच मैत्री आणि तशी श्रद्धा
नसलेल्यांशी शत्रुत्व करणे) ही इस्लामची मुलभूत तत्त्वे असून, श्रद्धाळू मुस्लिमांची ती महत्वाची
कर्तव्ये आहेत. ही तत्त्वे ‘अल्लाहच्या पवित्र ग्रंथां’त (कुराण आणि हदीथ ह्यांमध्ये) जागोजागी वर्णिलेली
आहेत.

उदाहरणार्थ :

१. “ज्यांचा अल्लाहवर आणि कयामतवर दृढ विश्वास आहे, अशा कोणीही व्यक्ती अल्लाह आणि
त्याच्या प्रेषिताच्या (मुहम्मदाच्या) विरोधकांशी कधीही मैत्री करणार नाहीत. ह्यामध्ये वडील,
मुले, बंधुभगिनी, नातेवाईक, कोणाचाही अपवाद नाही. ज्यांचा केवळ अल्लाहवरच दृढ विश्वास
असतो, तेच त्याचे आवडते असतात आणि ते त्याच्या बरोबर अनंत काळ स्वर्गसुख भोगतील.
ते अल्लाहच्या बाजूचे असतात आणि अल्लाहची बाजूच नेहमी यशस्वी होते.” – अल-
मुजादीलाह 58:22

२. “श्रद्धाळू मुस्लिमांनो, तुम्ही कधीही तुमचे मित्र, संरक्षक, अथवा सहाय्यक म्हणून (अवलिया
म्हणून,) अश्रद्ध लोकांना स्वीकारू नका. (केवळ सश्रद्ध मुस्लिमांनाच स्वीकारा.) तसे करून,
तुम्हाला अल्लाहकडे तुमच्या पापी असण्याचा उघड पुरावा का द्यायचा आहे ?” – अल-निसा
4:144

३. “श्रद्धाळू मुस्लिमांनो, तुम्ही कधीही ज्यू, ख्रिश्चन, (हिंदू) वगैरे गैर मुस्लिमांना आपले मित्र,
संरक्षक, सहाय्यक म्हणून स्वीकारू नका. ते केवळ त्यांच्यात – आपआपसातच मित्र असतात.
जर तुमच्यापैकी कोणी त्यांना मित्र म्हणून स्वीकारले, तर तो निश्चितच, त्यांच्यातलाच एक
होईल. ‘अल्लाह’ कधीच अन्यायी, पापी, अनेकेश्वरवादी, दुष्ट लोकांना मार्गदर्शन करत नाही.” –
अल-माईदाह 5:51

४. “श्रद्धाळू मुस्लिमांनो, तुम्ही कधीही तुमचे सल्लागार, मार्गदर्शक, संरक्षक, सहाय्यक, किंवा
मित्र म्हणून, गैर मुस्लीम (अर्थात, ज्यू, ख्रिश्चन, मूर्तिपूजक, अनेकेश्वरवादी, पाखंडी)
व्यक्तीला स्वीकारू नका. कारण अशी व्यक्ती निश्चितपणे तुम्हाला बिघडवल्याशिवाय राहणार
नाही. तुम्हाला भीषण संकटात टाकणे, हीच तिची इच्छा असते. तिच्या वाणीत तर तिरस्कार
असतोच, पण तिच्या हृदयात जे विष असते, ते त्याहून अधिक भयंकर असते. ह्या आयती
तुम्हाला अगदी स्पष्ट मार्गदर्शन देत आहेत, तुम्ही फक्त ते समजून घ्या.” – अल-इमरान
3:118

यावरून हे स्पष्ट दिसते, की इस्लाम मध्ये, – आणि त्यामुळे अर्थातच सच्च्या मुस्लिमांमध्ये – गैर इस्लामी धर्म, संप्रदाय,
यांचे अनुयायी, – विशेषतः मूर्तिपूजक आणि अनेकेश्वरवादी – यासर्वांविषयी अत्यंत तिरस्काराची, कटुतेची भावना
ठासून भरलेली आहे. ते गैर मुस्लीम व्यक्तीशी मैत्री करू शकत नाहीत. एखाद्या मुस्लिमाने तसा प्रयत्न केलाच तर ते
इस्लामला मुळीच मंजूर नाही. त्यामुळे मुस्लीम –बिगर मुस्लीम यांच्यात सांप्रदायिक सद्भाव वाढीस लागावा, या
हेतूने इफ्तार पार्ट्या आयोजित करणे, किंवा त्यांना उपस्थित राहणे, हे निरर्थक आहे. निव्वळ थोतांड आहे. गैर
मुस्लिमांना इफ्तार पार्टीला बोलावण्याचा इस्लामला मान्य असलेला हेतू – केवळ इस्लाम धर्माचा प्रसार – हाच असू
शकतो, हे वर उद्घृत केलेल्या आयतींमधून स्पष्ट होते.

हे ही वाचा:

किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

‘मुंब्र्यात सापडलेले दहशतवादी बाहेरून आलेले’

‘मुंब्र्यात कोंबिंग ऑपरेशन करा’

 

अल्पसंख्य तुष्टीकरण

आपल्या देशात मुस्लीम तुष्टीकरणासाठी इफ्तार पार्ट्या आयोजित करणे, किंवा त्या पार्ट्यांना उपस्थित राहून
आपल्या मुस्लीमप्रेमाचे प्रदर्शन करणे, हे गेली सत्तर वर्षे सतत चालू आहे. ते कसे चुकीचे आहे, हे लक्षात आणून देणे,
हाच या लेखाचा हेतू आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अलीकडे काही हिंदुत्ववादी संघटनासुद्धा – मुस्लिमांना
मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न – म्हणून इफ्तार पार्ट्यांच्या आयोजनाकडे पाहताना दिसतात. हे हास्यास्पद आहे. त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणायचे असेल, तर त्यांना दसरा दिवाळी संमेलन, होळी संमेलन अशा
कार्यक्रमांत आवर्जून बोलवावे. कारण हिंदू धर्म आणि अर्थात हिंदू सामान्य लोक, बिगर हिंदूंचा तिरस्कार करत
नाहीत, त्यांच्याविषयी कटुता बाळगत नाहीत. त्यामुळे, ते हिंदूंच्या सणांना, समारंभांना उपस्थित राहिले, तर हिंदू
त्याचे स्वागतच करतील. तोच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा योग्य मार्ग आहे. ‘इफ्तार’ चा नव्हे. कारणे वर
विस्ताराने आलेली आहेत.

त्यामुळे, समजा उद्या तुम्हाला एखादे ‘इफ्तार’ चे निमंत्रण आलेच, तर अगदी विनम्र पण स्पष्ट शब्दात नकार द्या.
आणि त्यांना, आतापासूनच, पुढे येणाऱ्या एखाद्या हिंदू सणाचे आमंत्रण देऊन ठेवायला विसरू नका. ते जरी
मूर्तीपूजकांचा, अनेकेश्वरवाद्यांचा तिरस्कार करत असले, तरी आम्ही निर्गुण उपासकांचा, एकेश्वरवाद्यांचा, इतकेच
काय, अगदी निरीश्वरवाद्यांचा सुद्धा आदरच करतो. “वसुधैव कुटुंबकम” ही आमची हिंदू संस्कृती आहे. आणि “मुख्य
राष्ट्रीय प्रवाह” म्हणतात, तो ही हाच आहे.

-श्रीकांत पटवर्धन

Exit mobile version