29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरदेश दुनियाभारतीय संघाला बाबर घाबरला का?

भारतीय संघाला बाबर घाबरला का?

Google News Follow

Related

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम हा भारतीय संघाला घाबरला आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. या प्रश्नाला कारण ठरत आहे. पाकिस्तानचा निवृत्त जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याचे एक ट्विट!

आयसीसी मेन्स टी-२० स्पर्धेच्या ‘सुपर १२’ फेरीमध्ये आज म्हणजेच रविवार २४ ऑक्टोबर रोजी या फेरीतील सर्वात धमाकेदार असा सामना जगभरातील क्रिकेट रसिकांना पाहता येणार आहे. तो सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान. त्यामुळे यावेळी नेमका कोणाला ‘मौका’ मिळणार याची चर्चा जगभर रंगलेली पाहायला मिळत आहे. पण अशातच पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अखतर याच्या ट्विटमुळे एक वेगळीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

समीर वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते… क्रूझ प्रकरणातील पंच साईलचा दावा

ICC Men’s T20 WC: आज कोणाला ‘मौका’?

आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट…कोण आहे कुणाल जानी?

विद्यार्थी पोहोचले पण परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, प्रश्नपत्रिकाच नाहीत!

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अवघे काही तास शिल्लक असताना शोएब अख्तर याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याला उद्देशून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शोएब अखतर बाबर आजमला असे सांगत आहे की तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे मैदानात उतरल्यावर घाबरायचं नाही. शोएब अख्तरच्या या ट्विटने समाजमाध्यमांवर उलट-सुलट चर्चा रंगताना दिसत आहेत. तर पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम हा भारतीय संघाला टरकून आहे का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

आजवर पाकिस्तानी संघाने कोणत्याही विश्वचषकात भारताचा पराभव केलेला नाही. आजवर टी-२० विश्वचषकातही पाच वेळा हे दोन्ही संघ आमने सामने आले असून प्रत्येक वेळीच भारताने पाकिस्तानला मात दिली आहे. त्यामुळे हा इतिहास आज बदलणार की तसाच कायम राहणार हे आता अवघ्या काही तासांत ठरणार आहे. ७.३० वाजता या हाय व्होल्टेज नाट्याला सुरुवात होणार आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा