इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्ला हा ठार झाल्याची चर्चा आहे. प्रमुखाला ठार केल्याचा दावा अजूनही इस्रायल सैन्य करत आहे. मात्र, हिजबुल्ला आणि लेबनॉन अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. याच दरम्यान, इराणच्या सर्वोच्च नेत्याची सुरक्षित स्थळी रवानगी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्ला हा ठार झाल्याच्या चर्चेदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई सुरक्षित स्थळी गेले आहेत. देशाच्या आतमध्येच असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्या ठिकाणी त्यांना नेण्यात आले आहे, तेथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. इराण हा लेबनॉनच्या हिजबुल्ला आणि इतर प्रादेशिक मित्र देशांशी संपर्कात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. इस्रायलवर पुढील कारवाई काय असेल अशी चर्चा झाल्याची माहिती आहे.
हे ही वाचा :
वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात समाधानाच्या क्षणासाठी तीर्थदर्शन योजना
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला संबोधले नाच-गाण्याचा कार्यक्रम!
कुलगाममध्ये दोन दहशतवादी टिपले, एके-४७सह दारूगोळा जप्त!
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; जैश-ए-मोहम्मदच्या ६ सहकाऱ्यांना अटक!
दरम्यान, हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्ला ठार झाल्याची चर्चा असताना त्याची मुलगी झैनब नसरल्ला ही देखील ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. परंतु, अध्याप दोघांच्याही मृत्यूची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हिजबुल्लाच्या प्रवक्त्याने सय्यद नसरल्लाच्या मृत्यूचा दावा फेटाळून लावला आहे.