इस्राएल दूतावासाबाहेरील बॉम्ब हल्ल्यामागे इराणचा हात?

इस्राएल दूतावासाबाहेरील बॉम्ब हल्ल्यामागे इराणचा हात?

इस्रायली दूतावासाबाहेर २९ जानेवारी रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या स्थळी एक चिट्ठी सापडली आहे. या चिट्ठीमध्ये हा हल्ला केवळ ‘ट्रेलर’ असल्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर जानेवारी २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेलेला इराणचा लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी याच्या हत्येचा हा बदला असल्याचेही सांगितले आहे.

२९ जानेवारीच्या संध्याकाळी एकीकडे दिल्लीच्या विजय चौकात महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत बिटिंग रिट्रीट कार्यक्रम सुरु असताना दुसरीकडे त्यापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर असलेल्या इस्राएल दूतावासाच्या परिसरात बॉम्बस्फोटाची घटना घडली. या स्फोटाची तीव्रता कमी असाली तरीही दिल्लीतील अतिशय महत्वाच्या भागात आणि दूतावासाच्या काही शे मिटर अंतरावर हा स्फोट घडल्यामुळे हा बॉम्ब घटनास्थळी पोहोचला कसा? असा सवाल उपस्थित होत आहे. या बॉम्बमध्ये आयएमडीचा वापर करण्यात आला आहे. स्फोटाची तीव्रता कमी असल्यामुळे यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही काही गाड्यांचे नुकसान झाले आहे.

दिल्ली पोलिसांनी गेल्या काही आठवड्यात इराणहून भारतात आलेल्या नागरिकांची यादी मागवली आहे.

इराणकडून अशा प्रकारच्या हल्ल्याची शक्यता असल्यामुळे जगभरातील इस्रायली दूतावासांची सुरक्षा वाढवण्यात आली होती, अशी माहिती एनआयएने दिली.

Exit mobile version