30 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरदेश दुनिया हिजाबविरोधी आंदोलनाचे नेतृत्व केल्याबद्दल फुटबॉलपटूला फाशीची शिक्षा

 हिजाबविरोधी आंदोलनाचे नेतृत्व केल्याबद्दल फुटबॉलपटूला फाशीची शिक्षा

निदर्शनांसाठी ११ जणांना आधीच फाशीची शिक्षा

Google News Follow

Related

हिजाबविरोधी आंदोलनाचे नेतृत्व केल्याबद्दल आणि महिलांच्या हक्कांचे समर्थन केल्याबद्दल इराणने एका फुटबॉलपटूला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अमीर नसर-आझादानी  असे या फुटबॉलपटूचे नाव आहे.  अमीर नसर हा   इराणच्या १६ वर्षाखालील राष्ट्रीय संघाकडून खेळला आहे. इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या माजी कर्णधारासह अनेक खेळाडूंनी या फुटबॉलपटूला वाचवण्याचे आवाहन केले आहे.  तरीही इराण सरकारने अमीर नसर-आझादानीची शिक्षा माफ केलेली नाही.

सुरक्षा दलाच्या तीन सदस्यांना ठार मारणाऱ्या सशस्त्र दंगलीत भाग घेतल्याबद्दल फुटबॉलपटू अमीर नसर-आझादानीला अटक करण्यात आल्याचा दावा इराण सरकारने केला आहे. अमीर नसर-आझादानी २६ वर्षांचा असून इरांजवान बुशेहर एफसी संघासाठी बचावपटू म्हणून खेळतो. त्याच्या न्यायालयीन हजेरीदरम्यान, इराण सरकारने अमीर नसर-अझादानी यांच्यावर देशाविरुद्ध बंड केल्याचा, सशस्त्र टोळ्यांचा सदस्य असल्याचा, देशाची सुरक्षा बिघडवण्यासाठी परदेशी सैन्याला मदत केल्याचा आरोप केला. त्यांच्यावरील मोहराबेचा आरोप न्यायालयात सिद्ध झाला. मोहराबेह म्हणजे देवाविरुद्ध युद्ध करणे. इराणमध्ये या गुन्ह्याची शिक्षा मृत्युदंड आहे. इराणमधील देशव्यापी निदर्शनांनी सरकारला हादरवून सोडले आहे. त्यानंतर तेहरानने या महिन्यात दोन आंदोलकांना फाशी दिली आहे. या सर्व लोकांवर मोहराबेहचा आरोप आहे.

हे ही वाचा:

अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’

धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन

श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती

१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!

निदर्शनांसाठी ११ जणांना आधीच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असल्याचा दावा  अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने  केला आहे. अहवालानुसार किमान आठ जणांना अजूनही फाशीची शिक्षा होऊ शकते. सप्टेंबरमध्ये तेहरानच्या नैतिकता पोलिसांच्या कोठडीत २२ वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूनंतर निदर्शने सुरू झाल्यापासून हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे.  केवळ राजधानीतील ४०० लोकांना निषेधांमध्ये सहभागी झाल्याबद्दल १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असल्याचे इराणच्या न्यायव्यवस्थेनेम्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा