इराणचा इशारा; गाझावरील हल्ले इस्रायलने थांबवावेत नाहीतर….

‘हिजबुल्ला’ दहशतवादी संघटनेचा ‘हमास’ला पाठिंबा

इराणचा इशारा; गाझावरील हल्ले इस्रायलने थांबवावेत नाहीतर….

इस्रायल आणि पॅलस्टाईनमधील युद्ध अजूनही सुरूच असून हे युद्ध दिवसेंदिवस अधिक हिंसक होत आहे. या वादात इराणने उडी घेतली असून इस्रायलला इशारा दिला आहे. “इस्राईलने गाझापट्टीवरील हल्ले तातडीने थांबवावेत अन्यथा पश्चिम आशियातील हा संघर्ष अन्य देशांमध्ये देखील पसरू शकतो,” असा इशारा इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून देण्यात आला आहे.

हमास विरुद्ध इस्रायलच्या युद्धात ‘हिजबुल्ला’ या दहशतवादी संघटनेने ‘हमास’ला पाठिंबा देणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे या संघर्षाची व्याप्ती आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सगळ्या दहशतवादी संघटना एकत्र आल्या तर इस्राईलमध्ये भूकंप होईल, असा इशारा इराणकडून देण्यात आला आहे.

इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमिराब्दोल्हा हियान यांनी बैरूतमध्ये पत्रकारांशी बोलताना ही भूमिका मांडली. “इस्राईलने गाझावरील हल्ले शक्य तितक्या लवकर थांबवावेत, असे त्यांनी म्हटले आहे. इस्राईलला देखील हिजबुल्लाच्या सामर्थ्याची कल्पना असून त्यांच्याकडील दहशतवाद्यांच्या ताब्यात तब्बल दीड लाख क्षेपणास्त्रे असल्याचे बोलले जाते. यामध्ये काही अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा देखील समावेश असून ती थेट इस्राईलच्या महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करू शकतात.

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी इस्राईललादेखील स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे. पूर्व जेरूसलेम ही राजधानी असलेला स्वतंत्र पॅलेस्टाईन देश तयार करणे हाच या संघर्षावरील उपाय असल्याचे पुतीन यांनी ‘तास’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

हे ही वाचा:

भारतापुढे पाकिस्तानची दाणादाण, भारताचा आठवा वर्ल्डकप विजय

प्रशांत किशोर यांनी दिले नीतिश कुमारांना आव्हान

इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार

बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे

दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्रांनी सुचविलेल्या द्वि-राष्ट्र सिद्धांताचा अवलंब करावा. यामुळे इस्राईललादेखील शांततेत जगता येईल. या संघर्षात इस्राईलला जरी स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार असला तरीसुद्धा या संघर्षावर शांततेच्या मार्गानेच तोडगा काढला जाणे खूप गरजेचे आहे, असे पुतीन यांनी नमूद केले आहे.

Exit mobile version