इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी भारतावर टीका करत गंभीर स्वरूपाचे आरोपही केले आहेत. भारतात मुस्लिमांच्या हक्काचे उल्लंघन होत असल्याची टिपण्णी त्यांनी केली आहे. यावर भारताने इराणला खडेबोल सुनावले आहेत. भारतावर टिपण्णी करण्यापूर्वी त्यांनी स्वतःचे रेकॉर्ड्स बघावेत असा खोचक सल्ला भारताने इराणला दिला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी मुस्लीम हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश केला आहे. भारतावर मुस्लीम दडपशाहीचा आरोप करत खामेनी यांनी म्यानमार आणि गाझासह भारताचीही गणना त्या यादीत केली आहे. सुन्नी मुस्लीम आणि वांशिक अल्पसंख्याकांच्या दडपशाहीसाठी इराणला आंतरराष्ट्रीय टीकेला सामोरे जावे लागत असताना खामेनी यांनी ही टिप्पणी केली आहे. आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यावर प्रतिक्रिया दिली असून अशी टिप्पणी करण्यापूर्वी एखाद्याचे रेकॉर्ड तपासावेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याने केलेले विधान अमान्य असून त्यांच्या या विधानाचा आम्ही निषेध करतो, अशी तिखट प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मुंबईत गणपती विसर्जनासाठी २५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
कल्पेश दवे आता स्टार हाऊसिंग फायनान्सचे कार्यकारी संचालक
भारताच्या पहिल्या ‘वंदे भारत मेट्रो’चे उद्घाटन, ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ नावाने ओळख !
गेल्या १०० दिवसांत खूप अपमान झाला, पण ध्येयासाठी मी शांत राहिलो!
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करत इराणला खडे बोल सुनावले आहेत. इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारतातील अल्पसंख्यकांबाबत केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करतो. त्यांचं हे विधान चुकीच्या माहितीच्या आधारावर आहे. त्यांचे विधान आम्हाला मान्य नाही. जे देश भारतातील अल्पसंख्यकांवर टिपण्णी करतात, त्यांनी आधी स्वतःकडे बघावं, त्यानंतर दुसऱ्यांवर टिपण्णी करावी, असं रणधीर जैस्वाल यांनी सुनावले आहे.
Statement on Unacceptable Comments made by the Supreme Leader of Iran:https://t.co/Db94FGChaF pic.twitter.com/MpOFxtfuRO
— Randhir Jaiswal (@MEAIndia) September 16, 2024