‘हमासला इराणकडून निधीपुरवठा’

सुरक्षा परिषदेत इस्रायलने इराणवर लावले गंभीर आरोप

‘हमासला इराणकडून निधीपुरवठा’

इस्रायल आणि हमासदरम्यानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इस्रायली राजदूतांनी इराणवर हमासला निधीपुरवठा केल्याचा आरोप केला आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की, इराणच हमासच्या दहशतवाद्यांना निधीचा पुरवठा करतो आहे, असा दावा इस्रायलचे संयुक्त राष्ट्राचे राजदूत गिलाद एदार्न यांनी संयुक्त राष्ट्रात केला आहे.

 

इस्रायलच्या राजदूतांच्या या विधानाच्या काही तास आधीच इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांनी इराण फिलिस्तानींच्या आत्मसंरक्षणाचे समर्थन करतो, असे जाहीर केले होते. इस्रायल आणि त्यांचे समर्थक देशच त्यांच्या स्वतःची सुरक्षा धोक्यात टाकण्यासाठी जबाबदार आहेत, असे विधान करून त्यांनी सिरीया, लेबॅनॉन आणि इराकसह अन्य मुस्लिम देशांच्या सरकारांना फिलिस्तिनचे समर्थन करण्याचे आवाहन केले होते. फिलिस्तिनींना नामोहरम करण्यासाठी इस्रायल अरबसहित अन्य मुस्लिम राष्ट्रांशी संगनमत करण्याचे प्रयत्न करत आहे, असा दावाही रियासी यांनी केला आहे.

 

हे ही वाचा:

अबब! अबू आजमींचे ४५ फ्लॅट, वाराणसीच्या टॉवरमध्ये पाच मजले जप्त

भारतातील अमली पदार्थांच्या व्यापाराचे धागेदोरे पाकच्या ‘डी’ गँगपर्यंत

अपघातातील मृताचे शव कालव्यात टाकले; बिहारमधील तीन पोलिस निलंबित

श्री राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्यात लता दीदींचा स्वर गुंजणार

‘हा हल्ला म्हणजे फिलिस्तानी नागरिक गेल्या अनेक दशकांपासून सहन करत असलेल्या अत्याचाराला प्रत्युत्तर आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने गाझावरील अत्याचार रोखावेत, फिलिस्तानींवरील अत्याचार थांबवावेत, अल-अक्सासारख्या पवित्र जागेवरील अतिक्रमण हटवावे,’ असे आवाहन हमासचा प्रवक्ता खालिद कादोमी यांनी केले आहे.

Exit mobile version