इराणने इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर डागले क्षेपणास्त्र

इराणने इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर डागले क्षेपणास्त्र

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधील संघर्ष अजून शमण्याची चिन्हे दिसत नसताना आता इराण आणि इराकमध्ये पुन्हा एकदा संघर्ष चिघळला आहे. इराणने इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर क्षेपणास्त्र डागले आहेत. इराणने इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर तब्बल १२ क्षेपणास्त्र डागले आहेत. या घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून आता या आखाती देशांमधील संघर्षाचे युद्धात रुपांतर होते का? याकडे जगाचे लक्ष आहे.

शनिवार, १२ मार्च रोजी रात्री उशिरा हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्याप्रमाणात वित्तहानी झाली आहे. इराकी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराकमधील अमेरिकन दुतावासाच्या हद्दीत शनिवारी रात्री क्षेपणास्त्र हल्ला झाला. एकापाठोपाठ बारा क्षेपणास्त्र डागण्यात आले. या हल्ल्यामुळे परिसराला आग लागली.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार इराकमधील ईरबील या शहरामधील अमेरिकी दूतावासाच्या परिसरात शेजारील देश इराणने तब्बल १२ क्षेपणास्त्रे डागले. याची पुष्टी अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी दिल्याचे असोशिएटेड प्रेसने सांगितले आहे.

हे ही वाचा:

शरद पवार दाऊद संबंध? राणे बंधूंवर गुन्हा

भारतविरोधी जिहादसाठी केली जाणार होती मुस्लिम तरुणांची भर्ती

ओदिशामध्ये आमदाराच्या गाडीने २२ भाजपा कार्यकर्त्यांना चिरडलं

सोनिया, राहुल, प्रियांका राजीनामा देणार?  बातमीने खळबळ

दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष आणखी चिघळून त्यावर तोडगा निघण्याची चिन्ह दिसत नाही. रशियाने कीव्ह शहराच्या सीमेवरील हल्ले वाढवले आहेत. तर दुसरीकडे इराण आणि इराक यांच्यातील तणावामुळे जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version