पाकिस्तानमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

पाकिस्तानमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

दहशतवादाचा अड्डा असलेल्या पाकिस्तानात पुन्हा एकदा सर्जिकल झाला आहे. इराणने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत आपल्या दोन जवानांची मुक्तता केली आहे. इराणचे काही सैनिक हे पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेच्या ताब्यात होते. इराणने त्यांची सुखरूप सुटका केली आहे.

इराणच्या एलाईट रिव्होल्यूशनरी गार्डच्या दोन सैनिकांना पाकिस्तानमध्ये बंदी बनवण्यात आले होते. जैश-उल-अद्ल या संघटनेने २०१८ साली इराणच्या एकूण १२ सैनिकांना बंदी बनवले होते. त्यातील दहा सैनिकांची यापूर्वीच सुटका करण्यात आली असून या ताज्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये उर्वरित दोन सैनिकांचीही सुटका इराण ने केली आहे. २ फेब्रुवारीच्या रात्री इराणच्या सैन्याकडून हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आहे. या स्ट्राईक सोबतच इराण हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारा तिसरा देश ठरला आहे, तर पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

या आधी भारतानेही २०१६ साली सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पाकव्याप्त काश्मिरात घुसून भारतीय सैन्याने दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. भारतात घडवून आणलेल्या पठाणकोट, उरी अशा दहशतवादी कुरबुऱ्यांना या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Exit mobile version