लॉरेन्स बिश्नोईचा २० वर्षीय दुश्मन योगेश कदियानला इंटरपोलची नोटीस

अमेरिकेतील शस्त्रास्त्रे पुरवठादारांशी त्याचे जवळचे संबंध

लॉरेन्स बिश्नोईचा २० वर्षीय दुश्मन योगेश कदियानला इंटरपोलची नोटीस

लॉरेन्स बिश्नोई याचा प्रतिस्पर्धी असणारा २० वर्षीय गँगस्टर योगेश कदियान याला इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जाहीर केली आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्याला असल्याचे मानले जात आहे. भारतीय तपास संस्था अमेरिकेतील तपास संस्थांच्या मदतीने त्याचा माग काढत आहेत. शस्त्रास्त्रांमधील तज्ज्ञ असणारा योगेश हा बाम्बिहा गँगच्या शस्त्रास्त्रांच्या विंगचे काम पाहात असे. अमेरिकेतील शस्त्रास्त्रे पुरवठादारांशी त्याचे जवळचे संबंध असल्याचे मानले जात आहे. तसेच, तो खलिस्तानी समर्थकांशी संबंधित होता आणि भारतातील केल्या जाणाऱ्या हत्यांचा कट आखण्यात त्याचा सहभाग असे, असे म्हटले जात आहे.

योगेश हा १७ वर्षांचा असताना बनावट पासपोर्टच्या मदतीने अमेरिकेत पळून गेला होता. आता लॉरेन्स बिश्नोई गँगचे वर्चस्व मोडून काढत अमेरिका आणि कॅनडामध्ये स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याचा बम्बिहा गँगचा प्रयत्न आहे. बिश्नोईची तुरुंगातच किंवा न्यायालयात सुनावणीच्या तारखांना हत्या करण्याची त्याची योजना आहे. हा कट तडीस नेण्यासाठी तो त्याच्या गँगचा लकी पटिआल या अर्मेनियास्थित गुंडाशी सातत्याने संपर्कात आहे.

हे ही वाचा:

‘बागेश्वर बाबां’च्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विरोध!

‘मी टायगर नाही, मी राणे आहे’, निलेश राणे!

संरक्षण मंत्रालयाच्या प्रदर्शनात दिसली स्वदेशी शस्त्रांची ताकद

ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचा जबाब नोंदवला

योगेश आणि त्याचे सहकारी हे अमेरिकेत राहणारे गँगस्टर गोल्डी ब्रारा आणि बिश्नोईचा भाऊ अनमोल यांच्या हत्येचा कट आखत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही खबर इंटरपोलला मिळाली होती. त्यामुळे अमेरिका तसेच कॅनडामध्ये गँगवॉरची शक्यता असल्याने योगेशला रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. योगेशवर हत्येचा कट आखणे, हत्येचा प्रयत्न आदी गुन्हे दाखल आहेत.

 

 

नुकतेच त्याचे भारतातील घर आणि अन्य ठिकाणी छापे मारण्यात आले होते आणि त्याची माहिती सांगणाऱ्यास दीड लाख रोख रकमेचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्यात आली आहे. रेड कॉर्नर नोटीस म्हणजे प्रत्यार्पण, आत्मसमर्पण किंवा तत्सम कायदेशीर प्रक्रिया होईपर्यंत एखाद्या व्यक्तीला शोधून तात्पुरते ताब्यात घेण्याची इंटरपोलच्या सदस्य देशांच्या कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांना केलेली विनंती असते. याआधी योगेशसोबत काम करणाऱ्या गँगस्टर हिमांशू उर्फ भाऊ याला इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. तर, बिश्नोई सध्या अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अहमदाबादच्या तुरुंगात आहे.

Exit mobile version