तालिबानने अफगानिस्तानात अंतिम सरकार बनवण्याची घोषणा केल्यानंतर, आता या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. तालिबानने अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ असं केलं आहे. आता अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्याला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर तालिबानने आजच शपथविधीचं नियोजन केलं आहे.
तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक खतरनाक दहशवाद्यांचा समावेश आहे. ज्यांच्यावर गेल्या दोन दशकात अमेरिकन सैन्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे, त्यांच्याही मंत्रिमंडळात समावेश आहे.
नव्या सरकारचं नेतृत्त्व मुल्ला मोहम्मद हसन अखुंदकडे आहे. अखुंद हा तालिबानच्या संस्थापकांपैकी एक आहे. शिवाय हा यूएनच्या ब्लॅकलिस्टमध्ये समावेश आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा
जेव्हा ‘हम करे सो कायदा’ या चालतो तेव्हा ‘कायद्याचे राज्य’ उरत नाही
कायद्याचा धाक राहिलेला नाही, सरकार केवळ नियमबाह्य बदल्यांमध्ये व्यस्त आहे
साकीनाका बलात्कार पीडितेची झुंज अपयशी
अफगाणिस्तानचा नवा गृहमंत्री म्हणून हक्कानी नेटवर्कचा नेता सिराजुद्दीन हक्कानी पदभार स्वीकारणार आहे. तो अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआईच्या वॉण्टेड लिस्टमध्ये आहे.
तालिबानचा नेता मौलवी हिबतुल्लाह अखुंदजादाने आधीच सांगितल्याप्रमाणे, हे सरकार शरिया कायद्यानुसार चालेल. इतकंच नाही तर आम्हाला शेजारी राष्ट्र्रांशी चांगले संबंध हवे आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याचा आम्ही सन्मान करु, असंही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही इस्लामी कायदे आणि देशाच्या राष्ट्रीय मूल्यांच्याविरोधात नाही, असं अखुंदजादाने म्हटलं आहे.