भारत ३१ जानेवारीपर्यंत नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे स्थगित ठेवेल. असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी सांगितले. नवीन कोविड-१९ प्रकार, ओमिक्रॉनवरील वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, हा निर्णय जाहीर करण्यात आला. केंद्राने १५ डिसेंबरपासून अनुसूचित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू न करण्याचा निर्णय घेतल्याच्या काही दिवसांनंतर हे आले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने गुरुवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-१९ च्या क्लिनिकल उपचारांसाठी वापरल्या जाणार्या आठ गंभीर औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करण्यास सांगितले. त्याचबरोबर कोणत्याही संभाव्य वाढीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचा सल्ला दिला. ओमिक्रॉन प्रकारासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेत, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव आणि NHM MDs यांना सर्व आरोग्य सुविधांमध्ये कार्यक्षम व्हेंटिलेटर, PSA प्लांट आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स असल्याची खात्री करण्याचे आवाहन केले.
हे ही वाचा:
ममतांचे हे आदेश राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंताजनक
‘समिट फॉर डेमोक्रसी’मध्ये आज मोदींचे भाषण
भारतीय अर्थव्यवस्था ९% पेक्षा जास्त गतीने वाढणार
लस न घेऊन अखिलेशकडून शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचा अपमान
दरम्यान, एका दिवसात आणखी ९,४१९ लोकांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, भारतातील संसर्गाची संख्या ३४,६६६,२४१ वर पोहोचली आहे, तर सक्रिय प्रकरणांची संख्या ९४,७४२ वर पोहोचली आहे. असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार समजते. १५९ ताज्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर मृतांची संख्या ४,७४,१११ वर पोहोचली आहे. असं सकाळी ८ वाजता जाहीर केलेली आकडेवारी दर्शविते.