आंतरराष्ट्रीय उड्डाणांना एप्रिल पर्यंत स्थगिती

आंतरराष्ट्रीय उड्डाणांना एप्रिल पर्यंत स्थगिती

देशभरातील वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना ३० एप्रिल २०२१ पर्यंत स्थगिती दिली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २३ मार्च २०२० रोजी स्थगिती दिली होती. अजून पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी कायम आहे.

डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) काढलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे की, काही मार्गांवरील उड्डाणे चालू राहणार आहेत. या प्रत्येक मार्गाला केस-टू-केस विचार करून परवानगी देण्यात येणार आहे.

या पत्रकातून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, आंतरराष्ट्रीय सामानवाहू विमानांसाठी ही बंदी लागू नाही. त्याबरोबरच डीजीसीएकडूनच मान्यता देण्यात आलेल्या विशेष उड्डाणांना देखील ही बंदी लागू नसेल. याचाच अर्थ असा की, ज्या मार्गांवरील सेवा उभयपक्षी एअर बबल करारांतर्गत चालू आहेत, त्या चालूच राहणार आहेत.

हे ही वाचा:

प्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर

वाझे ठरतोय लादेन मार्गी

देशमुखांवरील आरोप गंभीर- सर्वोच्च न्यायालय

यापूर्वी डीजीसीएने माहिती दिली होती की आंतरराष्ट्रीय उड्डाणे ३१ मार्चपासून सुरू होतील, परंतु आता ती मुदत ३० एप्रिल २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सध्या भारताचा २७ देशांशी उभयपक्षी एअर बबल करार झाला आहे. यात जपान, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांचा समावेश होतो. त्याबरोबरच विदेशात अडकलेल्या परदेशी नागरिकांना परत घरी आणण्यासाठी सरकार मे २०२० पासून वंदे भारत मिशन अंतर्गत काही उड्डाणे करत आहे.

सर्व प्रकारची उड्डाणे कोविड-१९ मुळे २३ मार्च २०२० रोजी बंद करण्यात आली. त्यानंतर देशांतर्गत उड्डाणे सुरू झाली परंतु आंतरराष्ट्रीय उड्डाणे अजूनही बंदच आहेत.

Exit mobile version