युक्रेन आणि रशिया या दोन देशांमधील युद्ध दीड वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. दरम्यान, रशियासमोर आता नवं संकट उभं ठाकलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या विशेष मर्जीतील मानल्या जाणाऱ्या ‘वॅगनर ग्रुप’ने बंड केल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेन युद्धादरम्यान वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगनी प्रिगोझिन आणि पुतीन यांच्यातील वाद पेटला आहे.
वॅगनर ग्रुप हा एक खासगी सैनिकांचा गट असून त्यांच्या बंडानंतर रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांचे कार्यालय असलेल्या क्रेमलिनम परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. वॅगनर ग्रुप लष्करी बळाचा वापर करुन सत्ता उलथवण्याची चिंता पुतीन यांना असल्याची माहिती आहे. या घडामोडींनंतर मॉस्कोच्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
मिडीया रिपोर्टनुसार, हे बंड युक्रेनच्या बखमुत मधील तणावाशी संबंधित असल्याची माहिती आहे. बखमुतमध्ये वॅगनर ग्रुपचा ट्रेनिंग कॅम्प होता. काही दिवसांपूर्वी या कॅम्पवर मिसाईल हल्ला झाला. या हल्ल्यामागे क्रेमलिनचा हात आहे, असं वॅगनर ग्रुपचे चीफ येवगेनी प्रिगोझिन मानतात. या हल्ल्यानंतरच त्यांनी मॉस्कोला उद्धवस्त करण्याची शपथ घेतली आहे.
हे ही वाचा:
राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याकडून मोदींना खास ‘शर्ट’ भेट
‘सर्वांना वाटतं, मी योग्य व्यक्ती आहे’
अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यावरून पंतप्रधान मोदी इजिप्तला रवाना
पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पाचवी, आठवीच्या परीक्षेत पास व्हावचं लागणार!
वॅगनर ग्रुप पुतिन यांची सर्वात मोठी ताकत समजला जायचा. पण आता हाच ग्रुप पुतीन यांच्या विरुद्ध उभा राहिला आहे. आम्ही मॉस्कोपर्यंत जाणार, मध्ये कोणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, तर सोडणार नाही, असं वॅगनर प्रमुखांकडून सांगण्यात आलं आहे.