27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियासीपीएल आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतून ६२ हजार किलो कचरा केला गोळा

सीपीएल आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतून ६२ हजार किलो कचरा केला गोळा

Google News Follow

Related

पहिल्या स्वच्छता मोहिमेत अभिनव महाविद्यालय,पाटकर वर्दे  महाविद्यालय, रॉयल महाविद्यालय , सायली ज्युनियर महाविद्यालय  मधील ३५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. यावेळी दहा टन हुन अधिक प्लास्टिक व इतर कचरा काढण्यात आला. सीपीएल आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे दुसरे अभियान रविवार दिनांक २० नोंव्हेबर २०२२ रोजी भाईंदर पूर्व खाडी येथे कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी डीटीएसएस  महाविद्यालय , लाडीदेवी रामधर  महाविद्यालय, शंकर नारायण महाविद्यालय  मधील १५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. यावेळी कांदळवनातून चार टन इतका कचरा काढण्यात आला. निघालेल्या प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्वापर प्रक्रियेसाठी कारखान्यात पाठविण्यात आला.

सीपीएल आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला दोन महिने पूर्ण झाले आहेत. यामध्ये एकूण महाविद्यालयामधून २००० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे, तर समुद्रकिनाऱ्यामधून व कांदळवन भागातून ६२,०५० किलो प्लास्टिक व इतर कचरा काढण्यात आला आहे. काढण्यात आलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून फक्त उरलेला प्लास्टिक हे पुन्हा उपयोगात आणण्यासाठी पुनर्वापर करणाऱ्या कारखान्यात पाठविण्यात येत आहे.

आशियात न झालेल्या अशा ‘सीपीएल आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे’ उदघाटन शनिवार १९ व २० नोंव्हेबर २०२२ रोजी मिरा भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनारी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त  दिलीप ढोले, मिरा भाईंदर आमदार गीता जैन आणि मिरा भाईंदर महानगरपालिका उपआयुक्त रवी पवार तर भाईंदर पूर्व खाडी येथे कांदळवन स्वच्छता अभियानचे मॅग्रोव्ह-मॅन धीरज परब यांच्या हस्ते झाले होते. यावेळी ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मिरा भाईंदर शहराचे पर्यावरण दूत हर्षद ढगे, संस्थचे सहसंस्थापक व स्पर्धेचे समन्वयक ध्रुव कडारा, कुंदन सोलंकी, अब्राहम, विशाल पांडे, अमीन शेख, ललित सुथार, हर्षद मुळे, तोसिम तांबोळी, सौरभ कुशवाह तसेच मिरा भाईंदर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक उदावंत, स्वच्छता निरीक्षक रमेश घरत, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत, स्वच्छता अधिकारी अक्षय धबाले, अश्विन गोहोत्रे, रोहित कांबळे व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

 

यावेळी वरिष्ठ पत्रकार धीरज परब हे मुख्य अतिथी होते त्यांनी कांदळवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांचे निसर्गाप्रती प्रेम व उत्सुकता वाढल्याचे दिसले.

पर्यावरण दूत हर्षद ढगे यांच्या संकल्पनेतुन फॉर फ्युचर इंडिया संस्था व मिरा भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्तविद्यमाने , तर स्वच्छ सर्वेक्षण २०२२३ , नारी सशक्तीकरण, कारुळकर प्रतिष्ठान व बिमा मंडी यांच्या सहकार्याने सीपीएल आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १९ नोंव्हेबर २०२२ ते १२ मार्च २०२३ या चार महिन्याच्या कालावधीमध्ये राबवली जाणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयला प्रत्येक महिन्याला एक समुद्र किनारा व एक कांदळवन भाग स्वच्छ करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये एकूण ३२ स्वच्छता मोहीमा राबविल्या जातील ज्यामध्ये संघाने एक समुद्रकिनारा व एक कांदळवन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेणे अनिवार्य आहे.

समुद्र किनारा स्वच्छता अभियान
१ .उत्तन, भाईंदर
२. वेलंकनी, भाईंदर
३. गोराई, बोरिवली
४. मनोरी, मालाड या ठिकाणी राबविण्यात येईल.
तर कांदळवन स्वच्छता अभियान हे,
१. भाईंदर पूर्व खाडी
२. भाईंदर पश्चिम खाडी
३. बोरिवली पश्चिम येथील गोराई खाडी
४. मालाड, मनोरी येथे समुद्रकिनारी भागात राबविण्यात येत आहे.

“या स्पर्धेद्वारे प्लास्टिकच्या वापराने आपल्या सागरी जीवांची हानी कशी घडते याबाबत मोठ्या प्रमाणावर जन-जागृती घडून येईल आणि मोठ्या प्रमाणावर वातावरण बदल होईल असा हर्षद ढगे यांचा विश्वास आहे.” या स्पर्धेत मुंबई, वसई-विरार व मिरा भाईंदर शहरातील शैलेंद्र महाविद्यालय, शंकर नारायण  महाविद्यालय, लाडीदेवी रामधर  महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय, पाटकर वर्दे महाविद्यालय, अथर्व  महाविद्यालय, भवन्स  महाविद्यालय, ठाकूर  महाविद्यालय, डी.टी.एस.एस. महाविद्यालय, सह्याद्री महाविद्यालय, रॉयल  महाविद्यालय, सेंट रॉक्स डिग्री महाविद्यालय, नालंदा  महाविद्यालय, सायली ज्युनियर महाविद्यालय, गोखले महाविद्यालय, के.ई.एस. श्रॉफ  महाविद्यालय सहभागी होत दोन हजारहुन अधिक विद्यार्थी स्पर्धेसोबत जोडले गेले आहेत.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा

सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

स्पर्धेत एकूण स्वच्छता मोहिमेत संघातील स्वयंसेवकांच्या उपस्थितीचा आकडा हा स्पर्धेतील ( प्रथम,द्वितीय,तृतीय) विजयी संघ ठरेल. या संघाना विजेते पारितोषिक प्रथम रोखरक्कम २०,०००रु., द्वितीय रोख रक्कम १५,०००रु., तृतीय रोख रक्कम १०,०००रु., तसेच सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सहभागी स्वयंसेवकांना मेडल व प्रमाणपत्र देण्याचे ठरले आहे. तसेच सहभागी संघाना सहभागी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा