करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची परत एकदा झीज झाली आहे त्यामुळे, मंगळवारी काल राज्य पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. लवकरच संवर्धनाची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे प्रशासक आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली आहे. देवीच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी पुन्हा मागणी होऊ लागल्यानंतर राज्य पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वाहने यांनी पाहणी केली होती. त्यांनी सध्याच्या मूर्तीच्या स्थितीबद्दल माहिती दिली. त्याप्रमाणे आता पुढील कार्यवाहीला सुरवात केली जाणार आहे. परत संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दर सहा महिन्यांनी मूर्तीची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. असे राहुल रेखावार यांनी सांगितले.
मूर्तीच्या संवर्धनाबाबत अजिबात चालढकल चालणार नाही मूर्तीची झीज तात्काळ थांबवण्यासाठी संवर्धनाची प्रक्रिया पारदर्शीपणे करण्याची मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी रेखावार यांना देण्यांत आले आहे. संवर्धनात तात्काळ कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने अंबाबाई विकास आराखड्याची ऐशी कोटींच्या निधीची घोषणा केली पण प्रत्यक्षात आठ कोटींचा निधी आला आहे. मंदिर परिसरातील रासायनिक संवर्धन प्रक्रिया आणि विकासकामे राबवताना या क्षेत्रामधील जाणकार व्यक्तींना विश्वासात घेतले जावे असे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
कर्मभूमी वानखेडेवर सचिनचा पुतळा उभा राहणार
मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचे राजीनामे
शेकापला फटका, धैर्यशील पाटील भाजपात दाखल
देशभरात गाजत असलेल्या उमेश पाल हत्येचा कट ‘मुस्लिम होस्टेल’मध्ये शिजला…
नवरात्र उत्सवाच्या आधी मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया झाली, त्यावेळी ती घाईगडबडीने केली गेली. याबाबत देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे याना भेटल्यावर त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत शिवाय प्रक्रियेबाबत माहिती आधी भाविकांना देण्यात आली नव्हती. असा आक्षेपसुद्धा यावेळेस व्यक्त करण्यात आला आहे. संवर्धन तात्काळ करणे आवश्यक असल्याने ते केले ,मात्र ते नियमांमध्ये राहूनच केले आहे’ असेही रेखावर म्हणाले आहेत.