भारतीय नौदलाने पहिल्यांदाच उत्तर आफ्रिकेतील अल्जेरिया या देशासोबत युद्धाभ्यास केला आहे. हा एक ऐतिहासिक स्वरूपाचा युद्धाभ्यास ठरला आहे. कारण पहिल्यांदाच भारत आणि अल्जेरिया या दोन्ही देशातील नौदलांनी एकत्र हा सराव केला आहे.
भारताकडून युद्धनौका ‘आयएनएस तबर’ या युद्ध अभ्यासात सहभागी झाली होती. तर अल्जेरिया कडून ‘इज्जादेर’ या युद्धनौकेने या सागरी सरावात सहभाग घेतला होता. अल्जेरिया देशाच्या सागरी हद्दीत हा ऐतिहासिक सागरी युद्ध अभ्यास पार पडला. रविवार, २९ ऑगस्ट रोजी हा संयुक्त युद्ध सराव पार पडला.
हे ही वाचा:
मथुरामध्ये दारू, मांसविक्रीवर बंदी
लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा
अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल
ठाकरे सरकारचे आदेश झुगारून मनसेने फोडली हंडी
या सरावाअंतर्गत, भारतीय आणि अल्जेरिच्या नौदलाने मनुष्यबळाचा समन्वय, संप्रेषण प्रक्रिया आणि स्टीम पास्ट यासह विविध उपक्रम संयुक्तपणे केले . या अभ्यासामुळे दोन्ही नौदलांना परस्परांच्या कार्याची संकल्पना समजून घेण्याची, एकमेकांची काम करण्याची पद्धत जाणून घेता आली .याशिवाय भविष्यात त्यांच्यातील परस्परसंवाद आणि सहकार्य वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तर त्यापूर्वी भारताने मोरोक्को या अफ्रिकन देशासोबतही संयुक्त सागरी युद्ध अभ्यास केला आहे. २५ आणि २६ ऑगस्ट रोजी मोरोक्को मधील कासाब्लांका या बंदरात हा युद्ध सराव कार्यक्रम पार पडला. यावेळीही आयएनएस तबर या युद्धनौकेचे भारताचे प्रतिनिधित्व केले. तर मोरोक्को तर्फे ल्युटंट कर्नल आराहमान या युद्धनौकेने मोरोक्कोचे प्रतिनिधित्व केले.