आयएनएस सुमित्राने चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला; १९ पाकिस्तानी नागरिकांसह इराणी जहाजाला वाचविण्यात यश

चाच्यांनी मासेमारी करणाऱ्या जहाजाचे अपहरण केले होते.

आयएनएस सुमित्राने चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला; १९ पाकिस्तानी नागरिकांसह इराणी जहाजाला वाचविण्यात यश

भारतीय नौदलाने मोठी कामगिरी करत चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस सुमित्राने एक यशस्वी मोहीम पार पाडली आहे. भारतीय युद्धनौका आयएनएस सुमित्रा हिने सोमवारी एडनच्या आखातात सोमाली चाच्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या मोहिमेत १९ पाकिस्तानी नागरिकांसह एका इराणी जहाजाला वाचविण्यात यश आले आहे. चाच्यांनी मासेमारी करणाऱ्या जहाजाचे अपहरण केले होते.

जहाजातून इमर्जन्सी कॉल आला होता. यानंतर युद्धनौकेने चाचेगिरीविरोधी मोहीम सुरू केली आणि त्यात मोठे यश मिळाले आहे. भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, इराणचा झेंडा असलेल्या एका मासेमारी जहाजावर सोमालियन चाच्यांनी ताबा मिळवला होता. जहाजावर असणाऱ्या १९ पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना त्यांनी बंधक बनवलं होतं. नौदलाला माहिती मिळाल्यानंतर एसओपीनुसार मोहीम आखण्यात आली. त्यानंतर १९ पाकिस्तान नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तसेच त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

इराणचा झेंडा असलेले एक मासेमारी जहाज सोमालीच्या किनाऱ्याकडे निघाले होते. यावेळी सोमालीच्या समुद्री चाच्यांनी या जहाजावर ताबा मिळवला होता. याची माहिती मिळताच भारतीय नौदलाने या चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला. जहाजावर असलेल्या १९ पाकिस्तानी नागरिकांनाही वाचवलं आहे.

गेल्या ३६ तासातील भारतीय नौदलाचे हे दुसरी यशस्वी मोहीम आहे. FV Iman नावाचे इराणचा झेंडा असलेले मासेमारी करणारे जहाज सोमाली चाच्यांनी ताब्यात घेतले होते. यावर १७ कर्मचारी होते. पूर्व सोमालीया किनारा आणि गल्फ ऑफ एडनच्या दरम्यान भारतीय नौदलाने मोहीम राबवून चाच्यांना हुसकावून लावले होते. या जहाजाला पुन्हा रवाना करण्यात आले होते.

हे ही वाचा:

ईडीच्या छापेमारीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री बेपत्ता; विमानतळावर अलर्ट जारी

रणजित सावरकरांच्या पुस्तकातून गांधीजींच्या हत्येवर प्रश्नचिन्ह

एक मुरलेला नेता दुसरा उरलेला…

कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा म्हणजे राजकीय पर्यटन

इस्राइल-हमास युद्धाचा भडका उडाल्यापासून अरबी समुद्रात समुद्री चाच्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यानंतर भारताकडून या भागामध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच युद्धनौका देखील तैनात करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version