इंदूरच्या बेलेश्वर मंदिरात सकाळपासूनच रामनवमी उत्सवाची लगबग सुरु होती. लहान मुले, महिला आणि अन्य भक्तांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी ११च्या सुमारास पूजा झाली.. पुजाऱ्यांनी आहुतीच्यावेळी उभे रहा सांगितले. मंदिरातील सर्व जण भक्तिभावाने हात जोडून उभे राहिले. पुढच्याच क्षणी काय होतेय ते कोणालाच काही कळले नाही. धरणीकंप झाल्यागत काहीतरी घडले आणि क्षणार्धात सर्व भक्त हात जोडलेल्या अवस्थेतच जमिनीत गडप झाले.
हा धरणीकंप नव्हता तर भाविक ज्या ठिकाणी उभे होते ती जमीन खचली आणि जमिनीच्या खाली असलेल्या ४० फूट खोल दरीत सर्व एकावर एक पडत गेले. मंदिराच्या आसपास उभे असलेल्या कोणाला काय झाले काहीच कळले नाही. डोळ्या समोरचे चित्र बघवणारे नव्हते. एक नाही दोन नाही तर तब्बल ५६ जण मंदिराच्या जमिनीखालील विहिरीत गाडल्या गेले होते. मंदिरात एकच चित्कार ऐकायला येत होता.
सुमारे ६० वर्ष जुन्या असलेले हे बेलेश्वर मंदिर हे एका विहिरीवर बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेले होते. विहिरीवर स्लॅब टाकून हे मंदिर बांधण्यात आलेले होते. मंदिराखाली असलेली विहीर ही जवळपास ४० पेक्षाही जास्त फूट खोल होती. जवळपास ४० वर्ष बंद अवस्थेत असलेल्या या विहिरीमध्ये पाच ते दहा फूट पाणी होते. विहिरीत असंख्य कचरा दुर्गंधी होती. कोणतीही मदत मिळण्याच्या आत स्थानिकच हिंमत करून विहिरीत बचावासाठी उतरले. दोराच्या मदतीने अनेक जण विहिरीत पडलेल्याना वाचवण्यासाठी उतरले. विहिरीच्या तळाला मिट्ट काळोख. विहिरीतून बाहेर काढायचे तरी कसे हा प्रश्न होता. या विहिरीमध्ये आडव्या तिडव्या सळया होत्या. त्याला धरत काही जण वर आले. जवळपास १२ ते १३ जणांनी स्थानिकांनी आणि बचाव पथकाने बाहेर काढले. विहिरीत पडलेल्यांमध्ये लहान मुले आणि महिला जास्त होत्या.
विहिरीमध्ये इतकी दुर्गंधी होती कि आत जान्याची कोणाची हिंमत नव्हती. विहिरीत इतकी घाण होती की त्यात अडकलेल्यांचा शोध घेणे शक्य होत नव्हते. अखेर दुपारी चार वाजता बचाव कार्य थांबवण्यात आले. मोटर पंप लावून विहिरीतून पाणी काढण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे विहीर जिवंत होऊन विहिरीतल्या अन्य ठिकाणांहून पाण्याचे झरे वाहू लागले. त्यामुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढली.
हे ही वाचा:
‘सावरकर गौरव यात्रेला’ जळगावातून सुरुवात
पंतप्रधानांनी पाहिले नवे संसदभवन… भव्य, सुसज्ज आणि नव्या रंगरूपात
संभाजीनगर राड्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले
रामनवमीचा सण देशभरात आनंदाने साजरा
घटना घडून सहा-सात तास झाल्यामुळे आत किणी वाचण्याची शक्यता उरली नव्हती. पण कोणाची पत्नी कोणाचा पती कोणाचा मुलगा विहिरीतून कोणीतरी जिवंत बाहेर येईल अशा वेड्या आशेवर होते. गुरुवारी रात्री पर्यंत १३ जणांना वाचवले होते. पण २२ जण बेपत्ता असल्याची यादी होती. हि बेपत्तांची यादी सकाळी मृत्यूनं मध्ये बदलली. या विहिरीने ३५ जणांना गिळून टाकले होते. शुक्रवारी या विहिरीच्या आसपासच्या स्नेहनगर, पटेल नगर मध्ये शुक्रवारी जिकडे तिकडे हुंदके, आक्रोश आणि अंत्ययात्रा इतकेच बघायला मिळत आहे. जाणणारा येणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द निघतोय तो म्हणजे खुनी विहीर.