ब्रिक्स (BRICS) हे भारत, ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. या संघटनेमध्ये आता आणखी एका देशाचा समावेश झाला आहे. इंडोनेशिया BRICS गटाचा पूर्ण सदस्य झाल्याची घोषणा ब्राझीलने केली आहे. २०२५ मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या ब्राझीलने सांगितले की, २०२३ मध्ये जोहान्सबर्ग शिखर परिषदेत इंडोनेशियाच्या उमेदवारीला ब्लॉकच्या नेत्यांनी मान्यता दिली होती.
एका निवेदनात ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिक्समध्ये प्रवेश केल्याबद्दल इंडोनेशियाचे स्वागत केले. त्यात म्हटले आहे की, इंडोनेशिया आणि इतर ब्रिक्स सदस्य जागतिक प्रशासन संस्थांच्या सुधारणांना पाठिंबा देतात. BRICS मध्ये प्रवेश केल्याबद्दल ब्राझीलचे सरकार इंडोनेशियाचे स्वागत करते. आग्नेय आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र म्हणून, इंडोनेशिया इतर BRICS सदस्यांसोबत जागतिक प्रशासन संस्थांच्या सुधारणेसाठी समर्थन सामायिक करतो आणि ग्लोबल साउथच्या सखोलतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो.
Indonesia Officially Joins BRICS As Full Member https://t.co/nSULO7RKE1
— BRICS News (@BRICSinfo) January 6, 2025
BRICS मध्ये सहभागी होणारा ब्राझील हा ११ वा देश ठरला आहे. याआधी इराण, इजिप्त, इथियोपिया आणि संयुक्त अरब अमिराती ब्रिक्सचे पूर्ण सदस्य बनले होते. २०२३ मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या शिखर परिषदेत BRICS मध्ये सामील होण्याच्या इंडोनेशियाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. यंदा ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली BRICS चे अध्यक्षपद भूषवले जात आहे. ब्रिक्स परिषद यावर्षी जुलै महिन्यात होणार आहे. ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे ही शिखर परिषद होणार आहे. यावेळी ब्रिक्सची थीम ग्लोबल साउथ आहे. सदस्य देशांमधील व्यापार सुलभ करण्यासाठी पेमेंट गेटवे विकसित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
हे ही वाचा:
दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्चीची गिरगावमधील कोट्यवधींची मालमत्ता जप्त
नेपाळमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्ली, बिहार, सिक्कीममध्ये जाणवले धक्के
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा अखेर राजीनामा
देशमुखांना मारताना आरोपी आनंद लुटत होते, व्हीडिओ काढत होते!
BRICS ची स्थापना २००९ मध्ये ब्राझील, चीन, रशिया आणि भारत यांनी केली होती. त्यांची पहिली शिखर परिषद रशियातील येकातेरिनबर्ग येथे झाली. २०१० मध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत दक्षिण आफ्रिकेचाही समावेश करण्यावर एकमत झाले होते. २०११ मध्ये सान्या येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत दक्षिण आफ्रिकेने भाग घेतला होता. २०२४ मध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांचा त्यात समावेश करण्यात आला.