इंदिरा गांधी यांची हत्येचे चित्रण कॅनडातील चित्ररथावर

खलिस्तानी परेडमध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे चित्रण

इंदिरा गांधी यांची हत्येचे चित्रण कॅनडातील चित्ररथावर

कॅनडामध्ये निघालेल्या खलिस्तानी परेडमध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे चित्रण करणारा भाग चित्ररथावर दाखवण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हीच कॅनडाची ‘इंडो पॅसिफिक’ व्यूहनिती आहे का?, असा सवालही करण्यात आला आहे.

सन १९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येचे चित्रण करणारा व्हीडिओ या चित्ररथात दिसत आहे. त्यामध्ये इंदिरा गांधीच्या रुपात एक पुतळा असून त्या मागे ‘बदला’ असे लिहिले आहे. तर, समोर अंगरक्षक त्या पुतळ्यावर बंदूक रोखून असल्याचे दिसत आहे. इंदिरा गांधी यांच्या साडीवर रक्त दिसत आहे. हा कथित व्हिडिओ ४ जून रोजी कॅनडाच्या ब्रॅम्प्टनमध्ये काढण्यात आलेल्या परेडचा असल्याचे म्हटले आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे चित्रण करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा चित्ररथ कॅनडाच्या ब्रॅम्प्टनमध्ये खलिस्तानी समर्थकांनी काढलेल्या पाच किमी लांबीच्या परेडचा भाग होता. ६ जून रोजी ऑपरेशन ब्लू स्टारचा ३९ वा वर्धापन दिन होता. तर, हा व्हिडीओ ४ जून रोजी खलिस्तान समर्थकांनी ब्रॅम्प्टनमध्ये काढलेल्या परेडमधील असल्याचे मानले जाते. या व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, अनेकांनी खलिस्तान समर्थकांनी काढलेल्या या परेडचा निषेध केला आहे.

हे ही वाचा:

१६ हजाराहून अधिक हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कोल्हापूरमध्ये व्हाट्सऍपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक

पु. ल. स्मृतीदिनानिमित्त रसिकांसाठी पर्वणी!

बीकॉम, मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन्स अभ्यासक्रमांना वाढता प्रतिसाद

पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांवर भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्याला ऑपरेशन ब्लू स्टार म्हटले जाते. जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखालील शेकडो शीख अतिरेक्यांना नेस्तनाबूत करण्याच्या उद्देशाने, लष्कराने ३ ते ६ जून १९८४ दरम्यान सुवर्ण मंदिर संकुलाला वेढा घातला होता आणि त्यात प्रवेश केला. ही मोहीम फत्ते झाली खरी, परंतु त्यानंतर ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच शीख अंगरक्षकाने हत्या केली होती.

Exit mobile version