इंडिगोचे उंच उड्डाण

भारतातील स्वस्त विमानवाहतूकीसाठी प्रसिद्ध असलेल्या इंडिगोचा विजयवारू २०२१ मध्येही वेगाने दौडत आहेच. अधिकाधीक विमानतळांवर आपले बेस बनवत आहे, त्याच बरोबर या विमानकंपनीने नुकतंच देशांतर्गत वाहतूकीसाठी ६३ व्या गंतव्य स्थानकासाठी सेवा सुरू केली. त्याबरोबरच ताफ्यात मोठ्या प्रमाणात ए३२०निओच्या समावेशानंतर एअरबसचे ते सर्वात मोठे ग्राहक झाले आहेत.

इंडिगोचे उंच उड्डाण

भारत जगातील हवाई क्षेत्रासाठी तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनू शकतो, परंतू सध्या भारतातील कमी लोक विमानप्रवास करतात. यापूर्वी वेळ आणि किंमत यामुळे विमानप्रवास चैनीचा होता, परंतू आता वाढत्या हवाई प्रवासामागे रेल्वे आणि रस्त्यांवरून होणारा थकवणारा प्रवास टाळणे हे कारण असते.

आता कोविड-१९ वर लस मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायाला चालना मिळू शकेल. त्यामुळे भारत पुन्हा एकदा ७ टक्क्यांचा विकासदर गाठू शकेल. एअरबसच्या मते २०३८ पर्यंत भारतातील २० टक्के लोक हवाई प्रवास करायला लागतील.

इंडिगो या वाढीचा लाभ घेऊन देशांतर्गत स्वस्त दरातील विमान वाहतूक करणारी कंपनी म्हणून आपले अग्रस्थान कायम राखू इच्छिते. भारत हा दरांबाबत अतिशय तीव्र स्पर्धा असलेला देश आहे. इंडिगो आणि इतर काही स्वस्त दरातील विमान कंपन्यांचा एकूण भारतीय नागरी विमान सेवेवर दबदबा आहे. ही परिस्थिती, बाजारपेठेचा विस्तार पाहिला तरीही इंडिगोचा मोठ्या प्रमाणात होत असलेला विकास पाहता, नजीकच्या काळात बदलण्याची काहीही शक्यता नाही.

इंडिगोने नुकतेच देशभरात सात ठिकाणी आपली कार्यालये चालू केली आहेत आणि देशभरातील विविध द्वितीय श्रेणीतील शहरांत होत असलेल्या विमानसेवेच्या विस्ताराकडे कंपनीचे लक्ष लागले आहे. या सात ठिकाणचे तळ फेब्रुवारी ते मार्चच्य दरम्यान कार्यान्वित होतील. एकाच ठिकाणी विविध वेळेत सेवा देण्याऐवजी कंपनीने जास्तीत जास्त ठिकाणी आपल्या सेवेचा विस्तार केला आहे. याशिवाय छोट्या शहरात कंपनी वेगाने आपल्या सेवेचा विस्तार करत आहे. त्यामुळे यावर्षी काही शहरात पहिले विमानसेवा देण्याची संधी इंडिगोने साधली आहे.

त्याबरोबरच इंडिगो आता आंतरराष्ट्रीय सेवादेखील चालू करणार आहे. २०२३ पासून एअरबस ए३२१एक्सएलआर विमानाच्या सहाय्याने कंपनी आंतरराष्ट्रीय सेवा चालू करणार आहे. यामुळे कंपनीला नवी बाजारपेठ उपलब्ध होईल. लांब पल्ल्याच्या या विमानामुळे कंपनीला फायदेशीर पर्याय उपलब्ध झाला आहे.

एकूणच कंपनी दशकभर पुढचा विचार करून पावले टाकत आहे. कोविड-१९ची महामारीचे संकट टळत असताना, बाजारपेठेत येणाऱ्या तेजीचा योग्य फायदा घेण्यासाठी कंपनी जय्यत तयार आहे.

Exit mobile version