भारतीय युवा बास्केटबॉल संघ आशिया कपसाठी पात्र

श्रीलंकेवर केली ६२-५५ मात

भारतीय युवा बास्केटबॉल संघ आशिया कपसाठी पात्र

कोलंबो, श्रीलंका येथे झालेल्या १६ वर्षांखालील मुलांच्या आशियाई अजिंक्यपद बास्केटबॉल पात्रता फेरी स्पर्धेत भारताने श्रीलंकेला नमवून विजेतेपद मिळविले. कोलंबोतील सुगथदास स्टेडियममध्ये हा सामना खेळला गेला. त्यात भारताने श्रीलंकेवर ६२-५५ अशी मात केली.

जरी भारताने श्रीलंकेला पराभूत केले असले तरी हे दोन्ही देश कतार येथे होणाऱ्या १६व्या फिबा आशिया कप बास्केटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहेत. १७ सप्टेंबरपासून ही स्पर्धा होत आहे. या सामन्यात भारताने ६२ गुण घेतले त्यात हरजीत सिंग १५, मोहित जोगदंड ११, ताजिंदरबीरसिंग १२, लोकेश कुमार शर्मा १० यांचा समावेश होता. श्रीलंकेला ५५ गुण घेता आले त्यांच्या अँटनी बर्नार्डने २५ तर विश्व हेरथने १० गुण घेतले.

हे ही वाचा:

कशेडी घाटात कोकणी माणूस सुसाट!

निवडणूक शपथपत्र प्रकरणात देवेंद्र फडणवीस दोषमुक्त

चार वर्षात आर्थिक गुन्हेगारांकडून ११.८ अब्ज डॉलर्सची मालमत्ता जप्त

पारशी समुदायाचा उगम मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाईतला

भारतीय संघ असा होता : कैलाश बिष्णोई, मृथुल वेल, दिव्यांश सिसोदिया, हरजित सिंग, आर्यन शर्मा, मोहित जोगदंड, अंकुश, सी. के. अद्वान, ताजिंदरबीर सिंग, लविश, जीन्स जॉबी, लोकेश कुमार शर्मा. प्रमुख प्रशिक्षक : राम कुमार ( ध्यानचंद पुरस्कार विजेते) प्रशिक्षक : असदउल्ला खान फिजिओ : रंजन शर्मा व्यवस्थापक : डोनाल्ड स्टीव्हन वाहलांग. पथक प्रमुख : फा. रॅलिन डिसुझा.

Exit mobile version