तालिबानने सुरु केलेले ‘पी.आर.’ आणि खोट्या बातम्या पसरवण्याचे अभियान जोरात सुरु आहे. तालिबानने काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे अनेक ‘लिबरल’ मंडळी प्रसन्न झाले आहेत. दुर्दैवाने यामध्ये भारतातील काही नगही आहेत.
याच ‘पी.आर.’चा एक भाग म्हणून तालिबानने सांगितले आहे की भारताचे अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेले सर्व प्रकल्प चालू ठेवावेत आणि त्यांनी ते पूर्णही करावेत. दरम्यान गेल्याच महिन्यात सत्ता संघर्षामध्ये तालिबानने भारताने बांधून दिलेले एक धारण उडवून लावले आहे. अशा पद्धतीने चांगली विधानं करून जगभरातील मुर्खांच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याचा तालिबानचा मानस आहे. अशी चेतावणी थेट खान अब्दुल गफ्फार खान उर्फ सरहद्द गांधींच्या नातीनेच दिली आहे.
“तालिबानवर विश्वास केला जाऊ शकत नाही. ते आत्ता काहीतरी बोलतील आणि नंतर त्यांना हवं तेच करतील.” असं वक्तव्य खुद्द खान अब्दुल गफ्फार खान यांच्या नातीने केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि इतर देशांच्या नेत्यांना अफगाणिस्तानच्या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
तालिबानने गेले काही दिवस महिलांना अधिकार देणार, हिंदू आणि शिखांना घाबरण्याचे कारण नाही, सरकारी कर्मचाऱ्यांना घाबरण्याची गरज नाही, अशा पद्धतीची वक्तव्य करून ‘पी.आर.’ कँपेन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच खान अब्दुल गफ्फार खानांच्या नातीचे हे वक्तव्य महत्वाचे आहे.
हे ही वाचा:
तालिबानने बामियानमध्ये आता ‘हा’ पुतळा उध्वस्त केला
तालिबानवर विश्वास ठेवता येणार नाही
रौप्य पदक जिंकूनही मोदींची रवी दहियाकडे तक्रार का?
ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र
अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी आता महिला वृत्त निवेदिकांवर बंदी घातली आहे. सरकारी न्यूज चॅनलच्या एका महिला वृत्त निवेदिकेला तालिबान्यांनी नोकरीवरुन काढून टाकलं आहे. कालच तालिबानने एका महिला वृत्त निवेदिकेला मुलाखत दिल्याची बातमी समोर आली होती, परंतु आज तालिबानने खरे रंग दाखवत महिलांना पुन्हा एकदा महिला वृत्त निवेदिकांवर बंदी आणली आहे.