27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरदेश दुनियाचक्रीवादळाने पीडित व्हिएतनाम, लाओस, म्यानमारच्या मदतीसाठी भारताचे ‘ऑपरेशन सद्भाव’!

चक्रीवादळाने पीडित व्हिएतनाम, लाओस, म्यानमारच्या मदतीसाठी भारताचे ‘ऑपरेशन सद्भाव’!

रेशन, कपडे आणि औषधांची मदत

Google News Follow

Related

चक्रीवादळाने व्हिएतनाम, लाओस आणि म्यानमारला मोठं नुकसान पोहचवलं असून या आपत्तीग्रस्त देशांच्या मदतीसाठी भारत ठामपणे उभा राहिला आहे. भारताने या देशांना मदतीचा हात पुढे करत ‘ऑपरेशन सद्भाव’ सुरू केले आहे. भारताने रविवारी व्हिएतनाम, लाओस आणि म्यानमारला संकटाचा सामना करण्यासाठी ‘ऑपरेशन सद्भाव’ अंतर्गत आपत्कालीन मदत पाठवली आहे. म्यानमार, लाओस आणि व्हिएतनामच्या काही भागांना आशियातील सर्वात शक्तिशाली ‘यागी’ चक्रीवादळाने दणका दिला आहे यानंतर या भागांना मोठ्या प्रमाणावर पुराचा सामना करावा लागला आहे.

साधारण आठवड्याभरापूर्वी दक्षिण चीन समुद्रातून उद्भवलेल्या वादळामुळे व्हिएतनाम, लाओस आणि म्यानमारच्या काही भागांमध्ये भूस्खलन झाले. व्हिएतनाममध्ये १७० आणि म्यानमारमध्ये सुमारे ४० लोकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने या देशांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, ‘ऑपरेशन सद्भाव’ हा भारताच्या ‘ऍक्ट ईस्ट’ परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने आशियाई प्रदेशात मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणमध्ये (HADR) योगदान देण्याच्या भारताच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. अहवालानुसार, भारताने व्हिएतनामला अमेरिकी १ लाख डॉलर्स आणि लाओसला अमेरिकी १ लाख डॉलर्स मानवतावादी मदत पाठवली आहे.

हे ही वाचा : 

नापाक इरादे… भारत- बांगलादेश सीमेवर आण्विक क्षेपणास्त्रे तैनात करण्याविषयी चर्चा

हैद्राबादमधील सिकंदराबादमध्ये बाप्पाच्या वेशभूषेवरून वाद

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न? हल्लेखोर अटकेत

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या पत्रकाराची सॅम पित्रोदांनी मागितली माफी

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले की, भारतीय नौदलाच्या INS सातपुडा जहाजातून म्यानमारला रेशन, कपडे आणि औषधे असलेली एकूण १० टन मदत पाठवण्यात आली आहे. त्याच वेळी, भारतीय वायुसेनेच्या सी-१७ हवाई दलाच्या विमानाने १० टन मदत सामग्री लाओसला पोहोचवली, तर ३५ टन मदत व्हिएतनामला पाठवली आहे. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्हिएतनामचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री बुई थान सोन यांच्याबद्दलही सहानुभूती व्यक्त केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा