जी-२०च्या यशस्वी अध्यक्षतेनंतर भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उजळली

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

जी-२०च्या यशस्वी अध्यक्षतेनंतर भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उजळली

‘जी-२०चे अध्यक्षपद भूषवणे हे राजनैतिक इतिहासाचा उल्लेखनीय काळ होता. जी-२०च्या यशस्वी अध्यक्षतेनंतर जगभरात भारताची प्रतिमा एक मित्र राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर मत देणाऱ्या देशाच्या रूपात झाली आहे,’ असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले. दिल्लीमध्ये शुक्रवारी एका पुस्तक प्रकाशनादरम्यान ते बोलत होते.

जयशंकर यांनी आपल्या भाषणात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जी-२० शिखर परिषदेत युक्रेन युद्धावर मतभेद असूनही नेत्यांची घोषणा तयार करण्यासाठी मिळालेल्या यशाचा आवर्जून उल्लेख केला. याबाबत सहमत मिळवेपर्यंत शेवटचे ४८ तास कसोटीचे होते, असेही त्यांनी सांगितले. ‘इंडिया अँड द फ्युचर ऑफ जी-२०: शेपिंग पॉलिसिज फॉर अ बेटर वर्ल्ड’ या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते.

हे ही वाचा:

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेना नेत्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार

दादरचा महात्मा गांधी जलतरण तलाव गुदमरतोय

दिवाळखोर पाकिस्तान आता मालदीवला मदत करणार!

मशीद कमिटीची याचिका फेटाळली, ज्ञानवापीत पूजा सुरूच राहणार!

‘भारताच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी जी-२० परिषद जगभरात एक विश्वमित्र, एक मित्र, एक सामूहिक निर्णय घेणारा, विविध राष्ट्रांना जोडणारा पूल या रूपात आपली क्षमता जोखणारे परीक्षण होते. बहुपक्षवादाला रुळांवर आणण्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकेला दिलेल्या हमीपर्यंत जी-२० अध्यक्षताकाळात आपण खूप काही मिळवले. ही भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे,’ असे जयशंकर म्हणाले.

Exit mobile version