५० वे जी- ७ शिखर संमेलन १३ जून ते १५ जूनपर्यंत इटलीतील अपुलिया क्षेत्रातील बोर्गो इग्नाजिया रिसॉर्टमध्ये होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो व जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्ज इटलीला पोहोचले आहेत. या दरम्यान इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर भारताची छाप दिसली. त्यांनी परिषदेत सहभागी होणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे ‘नमस्ते’ करत स्वागत केले.
मेलोनी यांनी जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्ज आणि युरोपीय आयोगाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांचे नमस्ते म्हणत स्वागत केले. त्यांच्या या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि भारतीय मेलोनी यांचे कौतुकही करत आहेत. त्यांनी बायडेन आणि ऋषी सुनक यांचेही मोठ्या आदराने स्वागत केले. बायडेन यांनी मेलोनी यांना सॅल्युट करून त्यांचे स्वागत केले.
तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. भारत जी ७ परिषदेत अतिथी देश म्हणून सहभागी होतो. भारताला जी ७ परिषदेत सहभागी होण्यासाठी ११व्यांदा आमंत्रण मिळाले आहे. मोदी या परिषदेत ग्लोबल साऊथच्या मुद्द्यांवरही भाष्य करतील, असे म्हटले जात आहे.
हे ही वाचा..
आमिर खानच्या मुलाच्या ‘महाराज’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला न्यायालयाकडून स्थगिती
तिसऱ्या कार्यकाळातील पहिली भेट इटलीला दिल्याचा आनंद
‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या ऍडिशनल प्रोग्रॅम सेक्रेटरी पदी संजय ढवळीकर यांची नियुक्ती!
सरसंघचालकांचे खडे बोल, नेमके कोणासाठी?
काय आहे जी- ७?
जी- ७मध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा आणि जपान या देशांचा समावेश आहे. इटली सध्या जी ७ (सात देशांचा समूह)चे अध्यक्षतापद सांभाळतो आहे. जी-७चे सदस्य देशांकडे सद्यस्थितीत जागतिक सकल उत्पन्नाचा सुमारे ४५ टक्के वाटा असून ते जगभरातील १० टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करतात.