डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. अमेरिकेच्या संसदेत त्यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. यावेळी जगभरातील दिग्गज व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले होते. शपथविधी सोहळ्यात विविध देशांचे प्रतिनिधी आले होते. भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बोलावण्यात आले होते. मात्र, भारताकडून देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी उपस्थिती दर्शवली. मात्र, एस जयशंकर यांच्या बसण्याच्या बसण्याच्या जागेवरून जगभरात भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांची झलक जगाला पाहायला मिळाली अशी चर्चा सुरू आहे.
भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थिती लावली. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहिले असून एस जयशंकर यांनी हे पत्र पोहचवण्याचे काम केले. दरम्यान या सोहळ्याच्या वेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे अगदी समोरच्या पहिल्या रांगेत बसले होते. याचा फोटोही समोर आला आहे.
A great honour to represent India at the inauguration ceremony of @POTUS President Donald J Trump and @VP Vice President JD Vance in Washington DC today.
🇮🇳 🇺🇸 pic.twitter.com/tbmAUbvd1r
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) January 20, 2025
जयशंकर यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, वॉशिंग्टन डीसी येथे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभात परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधानांचे विशेष दूत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणे हा मोठा सन्मान आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्घाटन समारंभात पहिल्या रांगेत बसलेल्या जागतिक व्यक्तींमध्ये जयशंकर यांचा समावेश होता. दरम्यान, एस जयशंकर यांची पुढच्या रांगेत बसण्याची केलेली सोय ही ट्रम्प यांच्या नेतृत्वातील अमेरिका आणि भारतामध्ये असलेल्या घनिष्ठ संबंधांची ओळख आणि एक स्पष्ट संदेश म्हणून पाहिली गेली.
हे ही वाचा:
मुस्तफा काग्गा टोळीच्या चार गुंडांचा उत्तर प्रदेश एसटीएफकडून खात्मा
मुंबई सेंट्रलला रेल्वे पोलिसांनी पकडला ‘पुष्पा’
परशुराम हिंदू सेवा संघाची राज्य कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न
गायक अमीर हुसेन मगसौदलूला फाशी !
एस. जयशंकर हे पहिल्या रांगेत इक्वाडोरचे अध्यक्ष डॅनियल नोबोआ यांच्यासोबत बसलेले दिसले. त्यांच्या दोन रांगा मागे, जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया आणि त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष पेनी वोंग बसले होते. जपान आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश QUAD चा भाग असून या गटात भारत आणि अमेरिका यांचाही समावेश आहे.
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. भारत आणि अमेरिका यांना लाभ देण्यासाठी आणि जगासाठी एक चांगले भविष्य घडवण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.