जी-२० शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन आणि दिल्लीच्या जाहीरनाम्याला सर्वसंमती मिळाल्याने भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वगुणाचे जगभरातून कौतुक आहे. जगभरातील बहुतांश प्रसारमाध्यमांनी दक्षिणा आशियाई देशांमध्ये भारताचा दबदबा वाढत आहे, अशा शब्दांत भारतावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.
‘भारताने जी-२० शिखर परिषदेत दुभंगलेल्या विश्वशक्तींमध्ये करार घडवून आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा राजनैतिक विजय’ अशा शब्दांत अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने कौतुक केले आहे. अमेरिकेनेही भारतात पार पडलेल्या जी-२० शिखर परिषदेला यशस्वी संबोधित केले आहे. ‘जी-२० ही मोठी संघटना आहे. रशिया आणि चीन या संघटनेचे सदस्य आहेत. अशा परिस्थितीत ही परिषद यशस्वी झाली, असे आम्हाला वाटते,’ अशी प्रतिक्रिया अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी दिली.
नवी दिल्ली जाहीरनाम्यात रशियाच्या अनुपस्थितीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘सदस्य देशांचे विभिन्न प्रकारचे विचार होते. मात्र ही संघटना एक जाहीरनामा प्रसृत करण्यात यशस्वी ठरली. प्रत्येक देशांचे अखंडत्व आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी बांधील राहण्याची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाचे मूळ हेच असल्याने नवी दिल्ली जाहीरनाम्याचे महत्त्व मोठे आहे, असे मिलर यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
सत्तेत बसलेले लबाड, बेईमान नाहीत; संभाजी भिडेंनी जरांगे पाटलांना दिला विश्वास
‘मत्स्य ६०००’ च्या साथीने भारत समुद्राच्या उदरातील रहस्य उलगडणार
I.N.D.I.A. मध्ये भरलेल्या ताटावरून मारामारी
भारताची पाकिस्तानवर विक्रमी मात
‘१८व्या जी-२० शिखर परिषदेने विविधता आणि सद्भावनेच्या विश्वरूप दाखवले,’ दुबईस्थित गल्फ न्यूजने म्हटले आहे. तर, ब्रिटिश दैनिक ‘द टेलिग्राफ’ने भारताच्या नव्या विश्वव्यवस्थेच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून भारताचा उदय होत असल्याचे म्हटले आहे. ‘भारत हा नव्या जागतिक व्यवस्थेचे केंद्र होण्यासाठी अग्रेसर आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जी-२० शिखर परिषदेत हवामान बदलाच्या आव्हानावर विस्तृत चर्चा झाली,’ असे त्यांनी नमूद केले आहे. तर, कतारच्या ‘अल जजीरा’ने जी-२० शिखर परिषदेची यशस्वी सांगता झाली आणि रशियाने संतुलित जाहीरनाम्याची प्रशंसा केली असल्याचे सांगत यावर प्रकाश टाकला. तर, ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’या वृत्तपत्रानेही अमेरिका-रशियाने जी-२० शिखर परिषद यशस्वी झाल्याचे सांगितले आहे, असे वृत्त दिले आहे.
ब्राझिलचे राष्ट्रपती लुइल लुला डिसिल्व्हा आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रट यांनीही या संमेलनाचे न भूतो न भविष्यती असे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आहे.