ऑलिम्पिकनंतर भारताचे लक्ष आता पॅरालिम्पिक पदकांकडे

ऑलिम्पिकनंतर भारताचे लक्ष आता पॅरालिम्पिक पदकांकडे

टोकियो ऑलिम्पिकनंतर क्रीडाप्रेमींचे लक्ष आता पॅरालिम्पिकवर असणार आहे. पॅरालिम्पिकमधून भारताला पदकांची मोठी अपेक्षा असणार आहे. २४ ऑगस्टपासून ते ५ सप्टेंबर पर्यंत ही स्पर्धा रंगणार असून भारताचे ५४ क्रीडापटू नऊ क्रीडाप्रकारांत सहभागी होणार आहेत. यंदा १२व्यांदा भारताचे खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. यंदाच्या वर्षी भारतीय खेळाडू तिरंदाजी, ऍथलेटिक्स, कॅनोइंग, बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस आणि तायक्वांदो अशा नऊ प्रकारात सहभाग घेणार आहेत.

यंदाच्या वर्षी दोन वेळेचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू देवेंद्र झझारिया, उंच उडीपटू मरियप्पन थंगवेलू, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, पारुल परमार आणि नेमबाजीमध्ये दीपक सैनी आणि रुबिना फ्रान्सिस यांच्याकडून पदकाची सर्वाधिक आशा आहे. अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू सुयश जाधवकडून पदकाची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण काम कामगिरी केलेल्या तिरंदाज हरविंदर सिंग, राकेश कुमार यांच्याकडूनही पदकाची अपेक्षा आहे.

हे ही वाचा:

आता चिंता अफगाणिस्तानातून युरोपात होणाऱ्या स्थलांतराची

मध्य रेल्वे बांधणार १३ पादचारी पूल नव्याने

नक्षलवादाला गाडायाला सज्ज झाल्या ‘दुर्गा’

इंग्लिश खाडीत ‘कोकण’चा जलवा

आतापर्यंत झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने १२ पदकांची कमाई केली आहे. १९८४ आणि २०१६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने प्रत्येकी चार पदके कमावली होती. मात्र यंदा युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधत भारत पदकांची दोन अंकी संख्या गाठू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. यंदाचे पॅरालिम्पिक हे भारताच्या इतिहासातील उत्कृष्ट असेल. भारतीय खेळाडूंकडून पाच सुवर्णांसह १५ पदकांची अपेक्षा असल्याचे, मत भारतीय पॅरालिम्पिक समितीचे सरचिटणीस गुरशरण सिंग यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version