देशात लवकरच हायड्रोजन गाडी रुळावर धावताना दिसणार आहे. हायड्रोजन इंधनावर ट्रेन चालवणारा भारत हा जर्मनी, चीन आणि फ्रान्सनंतर जगातील चौथा देश ठरणार आहे.भारतीय रेल्वेने देशातील प्रमुख हेरिटेज मार्गांवर हायड्रोजन गाड्या चालवण्याची तयारी केली आहे.
नवीन वर्षात या गाड्या पहिल्या टप्प्यात निवडक आठ प्रमुख हेरिटेज रेल्वे ट्रॅक मार्गांवर चालवल्या जातील.
पर्यावरणाची काळजी घेण्यात आली आहेपर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हेरिटेज रेल्वे मार्गांवर हायड्रोजन इंधनावर आधारित गाड्या चालवल्या जातील. यातील बहुतांश नॅरोगेज लाइन आहेत. येथे हलक्या वजनाच्या गाड्या चालवल्या जातील. या गाड्या ‘वंदे मेट्रो’ म्हणून ओळखल्या जातील असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सध्या या सर्व हेरिटेज रेल्वे मार्गांवर डिझेल इंजिनच्या गाड्या चालवल्या जात आहेत. पण या सर्व गाड्या पर्यावरण संवेदनशीलभागातून जातात. त्यामुळे या भागात संवर्धनाच्या दृष्टीने प्रदूषणमुक्त इंधनाचा वापर करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
अजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही
अमेय घोले उद्धव गटाकडून शिंदे गटाच्या वाटेवर?
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय मग हे वाचाच!
‘विज्ञानामुळे महिलांचे सशक्तीकरण आणि महिलांमुळे विज्ञान सशक्त होते’
जर्मनीतील कोराडिया आयलिंट ही हायड्रोजन इंधनावर धावणारी जगातील पहिली गाडी आहे. ही गाडी ताशी १४० किलोमीटर वेगाने एक हजार किलोमीटर धावू शकते. चीनने नुकतीच शहरी रेल्वेसाठी आशियातील पहिली हायड्रोजनवर चालणारी गाडी सुरू केली आहे.