ऑस्ट्रेलियाच्या बाजारपेठेत भारतीय निर्यातदारांचे आता अनोखे स्वागत

ऑस्ट्रेलियाच्या बाजारपेठेत भारतीय निर्यातदारांचे आता अनोखे स्वागत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतरिम मुक्त व्यापार करार गुरुवारपासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला भारताच्या सहा हजारांपेक्षा जास्त उत्पादनांच्या निर्यातीवर कोणतेही शुल्क लागणार नाही. २ एप्रिल २०२२ रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

यामुळे कापड, चामडे इत्यादी हजारो घरगुती वस्तूंसाठी ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत शुल्क मुक्त प्रवेश मिळेल. निर्यातदार आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांच्या मते, या करारामुळे सुमारे पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट होऊन ४५ ते ५० अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे.

आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारामुळे कापड, चामडे, फर्निचर, दागिने आणि यंत्रसामग्रीसह ६,००० पेक्षा जास्त क्षेत्रातील भारतीय निर्यातदारांना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांनी ‘मविआ’चीच क्रेडिबिलिटी दाखवली!

जाहीर सभेत झाली चेंगराचेंगरी, सात जणांचा गेला जीव

अमली पदार्थ व्यापारातील संपूर्ण साखळीच शोधून काढण्याचे आदेश

अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर?

या करारावर २ एप्रिल रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. वस्त्रोद्योग आणि पोशाख, कृषी आणि मत्स्य उत्पादने, चामडे, पादत्राणे, फर्निचर, क्रीडासाहित्य, दागिने, यंत्रसामग्री आणि इलेक्ट्रिकल वस्तूंसह कामगार-केंद्रित क्षेत्रांना याचा मोठा फायदा होणार आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे (एफआयईओ) उपाध्यक्ष खालिद खान म्हणाले की, भारतीय निर्यातदारांसाठी ऑस्ट्रेलिया ही प्रमुख बाजारपेठ आहे. ते म्हणाले, हा करार आपल्या अंमलबजावणीच्या दिवसापासून म्हणजेच २९ डिसेंबरपासून आमच्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देईल.

Exit mobile version