पुढील पाच वर्षात भारताचे ‘नाणे’ खणखणीत

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अहवाल केला प्रसिद्ध

पुढील पाच वर्षात भारताचे ‘नाणे’ खणखणीत

भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे चित्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) अहवालानंतर समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ६ मार्च रोजी आपला नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत पुढील पाच वर्षांसाठी कोणत्या देशांचे भरीव योगदान असणार याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. यानुसार, भारत, चीन, अमेरिका आणि इंडोनेशिया हे चार देश जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये पुढील पाच वर्षात महत्त्वाचं योगदान देत राहतील, असं म्हणण्यात आले आहे.

अहवालानुसार, जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त योगदान हे भारत, चीन, अमेरिका आणि इंडोनेशिया या चार देशांचे असणार आहे. यापूर्वीही २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अशाच प्रकारचा अंदाज व्यक्त केला होता. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारताचा आर्थिक विकास दर हा ७ ते ८ टक्क्यांच्या दरम्यान राहिलेला आहे. जगातील अनेक देशांवर आर्थिक संकट आलेले असताना आणि अनेक देशांचा आर्थिक विकास संथ गतीने होत आहे. अशा स्थितीत भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालाने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

भारताची गणती ही सध्या विकसनशील देशांमध्ये होते. त्यामुळे भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून उदयाला येण्यासाठी आणखी काही वर्ष जावी लागणार आहेत. मात्र, या दिशेने भारताची होणारी वाटचाल ही गतीने होते असल्याचे दिसून आले आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वाधिक गतीने वाढत आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जागतिक पटलावर पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मोदी सरकारने भारताला तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.

हे ही वाचा :

मध्य प्रदेशातील गुना विमानतळावर विमान कोसळले!

पंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता

हा कसला राजा हा तर भिकारी!

मलाही मुसेवाला-नफेसिंगप्रमाणे मारतील!

जागतिक रेटिंग एजन्सी ‘मूडीज’ने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. मूडीजने यापूर्वी ६.१ हा अर्थव्यवस्था वाढीचा वेग दर्शवला होता. तो वाढवून आता ६.८ टक्के करण्यात आला आहे. मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यात देशाच्या अर्थव्यवस्थेने वेग घेतला आहे. या कालावधीत जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के राहिला. जागतिक सर्वेक्षणात अर्थव्यवस्था वाढीचा वेग ६.६ टक्के असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

Exit mobile version