30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरदेश दुनियाभुलवून रशियन सैन्यात भरती केलेल्या भारतीयांची होणार सुटका

भुलवून रशियन सैन्यात भरती केलेल्या भारतीयांची होणार सुटका

रशिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी पुतीन यांच्यासमोर मांडला मुद्दा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. यावेळी काही मुद्यांवर चर्चा करत असताना नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्यासमोर भारतासंबंधीचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. भारतातील तरुणांची फसवणूक करून त्यांना रशियन सैन्यात भरती केले जात असल्याचा मुद्दा पंतप्रधान मोदींनी पुतीन यांच्यासमोर मांडला. तसेच या तरुणांना पुन्हा मायदेशी सोडावे असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यानंतर रशियाने रशियन सैन्यात भरती होण्यासाठी दिशाभूल केलेल्या सर्व भारतीयांना सोडण्यास आणि त्यांना परत देण्यास मान्यता दिली आहे.

किफायतशीर नोकऱ्या किंवा शिक्षण देण्याचे आमिष दाखवून अनेक भारतातील तरुणांना रशियात पाठवले होते. त्यानंतर या तरुणांना युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी रशियन सैन्यात सामील करून घेण्यात आले. फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत या युद्धात किमान चार भारतीय नागरिक मारले गेले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या सुमारे ३० ते ४० भारतीय तरुण रशियन सैन्यात कर्तव्य बजावत आहेत. परत येण्याची इच्छा असूनही ते सैन्य सोडू शकले नाहीत, असे अहवालात म्हटले आहे. याआधीच दहा भारतीयांना परत आणण्यात आले आहे. उर्वरित तरुणांसाठी नवी दिल्लीने अनेक राजनैतिक प्रयत्न सुरू केले होते, परंतु औपचारिक रशियन आश्वासन प्रलंबित होते. पंतप्रधान मोदींच्या मॉस्को दौऱ्यात भारतीय नागरिकांची सुटका करणे ही सर्वोच्च प्राथमिकता होती.

हे ही वाचा:

कठुआमधील हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून; स्थानिकांनी मदत केल्याची माहिती

जम्मू काश्मीरमधील कठुआमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवानांना हौतात्म्य

पंतप्रधान मोदींचे रशियात जंगी स्वागत, विमानतळावर गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित!

वरळी अपघात प्रकरण – मिहीर शहा विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी!

नरेंद्र मोदींनी हा मुद्दा उपस्थित करताच रशियाकडून याला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदी पुतीन यांच्याशी चर्चा करणार आहेत. २०१९ नंतरचा त्यांचा रशियाचा हा पहिला दौरा आहे आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर रशियन आक्रमण सुरू झाल्यानंतरचा पहिला दौरा आहे. दोन्ही नेते व्यापार, ऊर्जा आणि संरक्षण यासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक विस्तारण्याचे मार्ग शोधण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा