27 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरदेश दुनियाअफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची लवकरच होणार सुटका

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची लवकरच होणार सुटका

Google News Follow

Related

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांची लवकरच सुटका करण्यात येईल असे आश्वासन भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी दिले आहे. अफगाणिस्तान मधील परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून आहे आणि आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे असे जयशंकर यांनी सांगितले आहे. या सर्व परिस्थितीत भारताने एक विशेष अफगाणिस्तान सेल स्थापन केला आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आली होती. सध्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारतकडे आहे. या बैठकीत भारतातर्फे अफगाणिस्तानातील संपूर्ण परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यापासून देशातील नागरिक, महिला, बालके साऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे असे भारतातर्फे सांगण्यात आले आहे. या बैठकीला अफगाणिस्तानचे प्रतिनिधी गुलाम एम इसाकजई उपस्थित होते.

 

भारताचा विशेष अफगाणिस्तान सेल!
अफगाणिस्तान मधील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने अफगाणिस्तान सेलची स्थापना केली आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे या सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलशी संपर्क साधण्यासाठी विशेष फोन नंबर आणि ईमेल आयडी बनवण्यात आले आहेत.
फोन नंबर +९१- ९७१७७८५३७९
ईमेल:- MEAHelpdeskIndia@gmail.com

आत्तापर्यंत भारताने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या काही भारतीय नागरिकांची सुटका केली आहे. तर उर्वरित नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकार हे काबूल मधील हिंदू आणि सिख समुदायाच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्या सुरक्षेची सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. सध्या अफगाणिस्तानमधील चिघळलेल्या परिस्थितीमुळे काबुल विमानतळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढणे हे सरकारसाठी मोठे आव्हान असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा