अफगाणिस्तानात आता तालिबानने राज्य हस्तगत केले आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केले. त्यामुळे तिथे अराजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळेस विविध देशांनी आपल्या नागरीकांना तेथून सोडवण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे.
भारताने देखील अफगाणिस्तानच्या आरजकातून आपल्या नागरीकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी एक विमान अफगाणिस्तानात देखील दाखल झाले आणि या विमानातून अनेक नागरिकांना सुरक्षित जामनगर येथे आणण्यात आले.
मात्र काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचे ऑपरेशन एअर लिफ्ट यशस्वी झाले असून, अफगाणिस्तानातील सर्व भारतीय नागरीक सुरक्षितरित्या भारतात दाखल झाले आहेत.
हे ही वाचा:
अमरूल्ला सालेह झाले अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती! पण कसे?
विवेक पाटीलांना ईडीचा दणका…२३४ कोटींची मालमत्ता जप्त
आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?
अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला
त्याबरोबरच अफगाणिस्तानातील इतर हिंदुंना देखील वाचवण्यासाठी भारत प्रयत्न करणार आहे. इतर देशामार्फत अफगाणिस्तानात गेलेल्या भारतीय नागरीकांना देखील वाचवण्यासाठी भारत प्रयत्न करणार असल्याचे समजले आहे. अशा प्रकारच्या नागरिकांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे समजले आहे. त्यासाठी एनएसए अजित डोवाल, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासोबत पंतप्रधानांच्या बैठका देखील सुरू असल्याचे समजले आहे.
मोदी सरकारने भारतीयांच्या केलेल्या या एअर लिफ्ट बद्दल भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी ‘मोदी है तो मुमकिन है’ असे म्हटले आहे. ते म्हणतात,
अफगाणिस्तानमधील भारताचं Operation Airlift यशस्वी झाले असून अफगाणिस्तानमध्ये अडकलेले सर्व भारतीय मायदेशी परतले आहेत. मोदी है तो मुमाकिन है
अफगाणिस्तानमधील भारताचं Operation Airlift यशस्वी झाले असून अफगाणिस्तानमध्ये अडकलेले सर्व भारतीय मायदेशी परतले आहेत.
मोदी है तो मुमाकिन है. @narendramodi pic.twitter.com/UixNoFw1Um— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 18, 2021