युक्रेनहून येणारे भारतीय ९ वाजता येणार भारतात

युक्रेनहून येणारे भारतीय ९ वाजता येणार भारतात

युक्रेन मध्ये भारताचे सुमारे १८ हजार नागरिक अडकले आहेत. त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार वेगाने प्रयत्न करत आहे. त्यासाठी आज एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI1943 विमान बुखारेस्टला रवाना झाले आहे. भारतीयांना रोमानियातून आणले जाणार असून आज सायकांळी ९ च्या सुमारास मुंबईत हे विमान पोहचणार आहे. या नागिरकांचे स्वागत करण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ह्या मुंबई विमानतळावर उपस्थित राहणार आहेत.

बचाव मोहीमेत पहिल्या टप्प्यात परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचारी हे युक्रेन सीमेला लागून असलेल्या हंगेरी आणि रोमानियाला विद्यार्थ्यांना पोहचवणार आहेत. यानंतर विद्यार्थ्यांना तिथून एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणले जाणार आहे. युक्रेनमधून निघताना विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा धरला होता. त्याचवेळी ते ज्या बसमध्ये चढले त्या बसवरही भारताचा तिरंगा आणि बसमध्ये भारतीय विद्यार्थी आहेत, असा फलकही लावण्यात आला होता.

युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून अडकलेल्या भारतीयांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १८ हजार आहे तर रशियात त्यांची संख्या १४ हजार आहे.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे यांचे आझाद मैदानात उपोषण

युक्रेन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारत तटस्थ

काय घडतंय युक्रेनमध्ये?

पाकिस्तान लष्करात दोन हिंदू अधिकारी

हल्ल्याच्या एक दिवस आधी २४० भारतीयांना भारतात आणले होते. त्यानंतर २४ आणि २६ फेब्रुवारीला दोन आणखी विमाने जाणार होती, मात्र २४ तारखेलाच रशियाकडून हल्ला सुरु झाला. त्यानंतर युक्रेनने हवाई क्षेत्र बंद कऱण्यात आल्याची घोषणा केली.

Exit mobile version